कामठी :-परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त ‘बाबासाहेबांचा जयजयकार’हे नावीन्यपूर्ण भीमगित उद्या 5 एप्रिल ला टी सिरीज कंपनी मुंबई मधून रिलीज होत आहे.
‘बाबासाहेबांचा जयजयकार’हे गीत विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील घोरपड या गावातील शिवा मोहोड नामक तरुणाने सतत एक वर्षे मागील कोरोना काळात बाबासाहेबांच्या विचारांचा अभ्यास करून व तथागत गौतम बुद्ध , सम्राट अशोक यांचा इतिहास लक्षात घेऊन, या महामानवांच्या ऐतिहासिक अभ्यासाने प्रेरित होऊन ओबीसी समाजातील या सर्वसामान्य तरुणाने बाबासाहेबांचा जयजयकार या गाण्याला स्वतः लिहून ,संगीतबद्ध करून गायले आहे हे इथं विशेष!आणि हे गीत उद्या 5 एप्रिल ला टी सिरीज वर रिलीज होत आहे.ही एक मोठी गौरवास्पद बाब आहे.याबाबत गायक शिवा मोहोड यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून खूप कौतुक करण्यात येत आहे.
‘बाबासाहेबांचा जयजयकार ‘हे गीत पूर्ण महाराष्ट्रात गाजलं पाहिजे व सर्वसामान्य जनतेपर्यंत बाबासाहेबांचा जयजयकार हे भीमगित गाजलं पाहिजे असे मत स्वर-गीत-गायक शिवा मोहोड यांनी प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केलं.