विद्यार्थ्यांशी आत्मनिर्भर भारत यावर संवाद
नागपूर: प्रत्येक क्षेत्राला भविष्याचा वेध घेणारी दृष्टी देणे व ती ज्ञानाने परिपूर्ण असणे, तसेच त्याचे यौग्य ज्ञान असणे, अशा प्रकारे आपण जिल्हा, तालुका पातळीवर तरुण मुलांसाठी नियोजन करणे आवश्यक आहे. आगामी काळात जुने सर्व बदलणार आहे. शेतीपासून सर्व क्षेत्रात यशस्वी पद्धती (pattern) व आवश्यक शिक्षण व त्यातून आपण पुढे गेलो तर आपला देश आर्थिक महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही, अशा विश्वास केंद्रीय महामार्ग वाहतुक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
आत्मनिर्भर भारत या विषयावर ते विदार्थ्यांशी संवाद साधत होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले इतिहास, संस्कृती आणि परम्परा ही आमची प्रेरणा आहे. या संस्कृतीत ३ वैशिस्त्ये आहेत. एकीकडे सामाजिक व दुसरीकडे आर्थिक आणि ज्ञानाच्या दृष्टीने आपल्याला संपन्न व्हायचे आहे. सर्व सुशिक्षित सुसंस्कृत असतात असे नाही. सुशिक्षित आणि सुसंस्कृत बनणे यातील फरक समजून आपल्याला जावे लागेल.
आपली संतांची भूमी आहे. संतांचा एक मोठा इतिहास आहे. त्यांनी ज्याप्रमाणे समाजाचे प्रबोधन केले तेही महत्वाचे आहे. संतांनी प्रबोधन, प्रशिक्षण आणि संस्काराच्या मध्यामातून प्रगल्भ महाराष्ट्र बनविण्याचा प्रयत्न केला. प्रबोधन आणि प्रशिक्षण यातून समाजावर होणारा संस्कार आणि त्यातून घडणारा माणूस ही थोर परंपरा आहे. संस्कारित आणि ज्ञान मिळवून क्षमतावान होणे व ज्ञानाचा संपत्तीत रुपांतर करणे हे महत्वाचे आहे, असे सांगताना ना गडकरी म्हणाले- विध्यार्थाना घडविण्यासाठी जी शैक्षणिक पद्धती तयार करण्यात आली, ती तयार करताना एक दृष्टीकोन समोर ठेवण्यात आला. त्यातून विध्यार्थ्यांवर एक संस्कार करून त्यांना घडविण्यात आले. यात सर्वात महत्वाचे म्हणजे विदायार्थाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात आले, असेही ते म्हणाले.
राज्यात वेगवेगळ्या समस्या आहेत. तालुका व जिल्हा स्तरावर, शेतकऱ्यांच्या, शेत मजुरांच्या, झोपडी वासिंयांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी उपाययोजना काय ते विध्यार्थाना शोधायचे आहे. कृषी ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान नेले पाहिजे, असे सांगताना ना गडकरी म्हणाले शेणापासून पेंट बनविणे आता शक्य झाले आहे. यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. बायोमास पासून बायो सीएनजी आणि बायो एलएनजी तयार होतो. यामुळे पेट्रोल आणि डीझेलची आयात कमी होणार आहे. योग्य दृष्टीकोन पुढे देशाच्या आणि समाजासाठी गरजेचा आहे. तो दृष्टीकोन, कौशल्य, ज्ञान योग्य प्रकारे विकसित करून आपण आत्मनिर्भर होऊ शकू असा विश्वासही ना गडकरी यांनी व्यक्त केला.