जयभीम चौकात माता रमाई आंबेडकर जयंती साजरी
नागपूर : प्रत्येक यशस्वी पुरूषाच्या मागे एक स्त्री असते असे म्हणतात. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदैव पाठीशी राहून समाजासाठी ते करीत असलेल्या कार्यात व्यत्यय येऊ नये म्हणून एकटीने सर्व संघर्ष पेलणारी त्यागमूर्ति रमाई बलिदानाचे प्रतिक व भारतीय महिलांकरिता एक आदर्श उदाहरण आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी केले.
शहरातील प्रभाग २६ मधील रमाई आंबेडकर मार्ग जयभीम चौक येथे त्यागमूर्ति माता रमाई आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी माता रमाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भाजप मंडळ महामंत्री जे.पी.शर्मा, युवा मोर्चा नेते बालू उर्फ हरेश्वर रारोकर, भाजपा ओबीसी आघाडी महामंत्री मनोहर चिकटे, संजय जानवे, शंकर मेश्राम, शेख गुड्डूभाई, किरण काथवटे, सोनम बागडे, गौतम नंदेश्वर, शंकर शेंडे, रॉबिन गजभिये, संदीप फुलझेले, मोसमी वासनिक, विमलबाई गोंडाणे, श्रीमती अडिकने, प्रतिभाबाई सहारे, सुमनबाई मेश्राम, विशाखा धारगावे, विक्रम डुंबरे, शेषराव गजघाटे आदी उपस्थित होते.
बासाहेबांनी समाजाच्या उद्धारासाठी आपले आयुष्य अर्पिले त्यांच्या या कार्यात रमाईचे योगदान बहुमूल्य आहे. घर, कुटूंब याकडे लक्ष न देता केवळ समाजहितासाठी बाबासाहेब लक्ष देऊ शकले त्याचे कारण रमाई आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच रमाई या सुद्धा समाजाच्या उद्धारकर्त्या आहेत. रमाईच्या बलिदान आणि त्यागातून बाबासाहेब निर्माण झाले. समाजासाठी रमाईंचे योगदान हे आईचे आहे, अशा शब्दांत अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी रमाईची महती सांगत त्यांना अभिवादन केले.