Advertisement
नागपूर : केंद्रीय रेल्वे व कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज कोराडी येथील जगदंबा देवी मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. तसेच आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानीही त्यांनी भेट दिली. याप्रसंगी आ. बावनकुळे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सौ. ज्योती बावनकुळे याप्रसंगी उपस्थित होत्या.
कोराडी देवी मंदिरात दर्शनानंतर ना. दानवे यांनी तेथील विकास कामांची विचारपूस केली. आ. बावनकुळे यांनी मंदिराच्या विकासाबद्दलची सर्व माहिती दानवे यांना सांगितली. जगदंबा देवी मंदिराचा चेहरामोहराच बदलून गेला असल्याचे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले.
याप्रसंगी मंदिरातील अन्य विश्वस्त भाविकांचीही दानवे यांनी विचारपूस केली.
Advertisement