नागपूर : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नागपूर विभागाच्या वतीने महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची कार्यशाळा संस्थेच्या कार्यालयात पार पडली. यावेळी समिती सभापती दिव्या धुरडे, समिती उपसभापती अर्चना पाठक, समिती सदस्य सोनाली कडू, रूपाली ठाकूर, उज्ज्वला शर्मा, मंगला लांजेवार यांच्यासह संस्थेचे संचालक जयंत पाठक उपस्थित होते.
यावेळी जयंत पाठक यांनी पीपीटीद्वारे महिला व बालकल्याण समितीची जबाबदाऱ्या व कार्ये या विषयावर सविस्तर माहिती दिली. 74 व्या घटना दुरूस्तीने महिलांकरिता आरक्षण व महिला व बालकल्याण समिती प्रत्येक शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये करण्यासाठी निर्देश दीले. महिला व बालकल्याण समितीमार्फत कोणकोणत्या उपाययोजना राबविल्या जाऊ शकतात, त्यासंदर्भातील निधीची तरतूद कशी असते, याकरिता असलेले शासन निर्णय, याची विस्तृत माहिती या कार्यशाळेत दिली गेली.
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे संचालन व आभार कार्यक्रम अधिकारी पुष्कर लाभे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासकीय अधिकारी राही बापट, निशा व्यवहारे, मंजिरी जावडेकर, जयंत राजुरकर, सुशील यादव, दीपक वनारे यांनी परीश्रम घेतले