Published On : Thu, Jun 10th, 2021

पिक विमा संदर्भात सरकारने हस्तक्षेप करीत शेतकऱ्यांना न्याय द्यावा: राचुरे

नागपुर – मागच्या वर्षी अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यावरची भरपाई रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळाली नाही. मोबाईल व इतर ऑनलाइन तांत्रिक बाबी वापरणे सामान्य शेतकऱ्याला शक्य झाले नाही याचा गैरफायदा घेत ही भरपाई टाळण्याचा प्रयत्न विमा कँपन्या करीत आहेत व सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. मागील वर्षीचा लॉक डाउन चा आर्थिक फटका बसल्याने शेतकऱ्यांचे कम्बरडे मोडले आहे.

आता पेरणीच्या काळात असलेली आर्थिक गरज भागवण्यासाठी सरकारने तातडीने पाऊले उचलत विमा कँपन्यांना नुकसानभरपाई रक्कम देणे भाग पाडावे असे निवेदन आपचे राज्य प्रमुख रंगा राचुरे यांनी राज्यमंत्री संजय बनसोडे यांना उदगीर येथे आज दिले.या मागण्या मान्य न झाल्यास शेतकऱ्याला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा या भेटीत त्यांनी दिला आहे.

Gold Rate
22 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,11,200 /-
Gold 22 KT ₹ 1,03,400 /-
Silver/Kg ₹ 1,33,000/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above
Advertisement
Advertisement