केंद्रीय आरोग्य मंत्रालयने केले हात वर
आरटीआईमध्ये धक्कादायक माहिती
खापरखेडा :- केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण मंत्रालयने माहिती अधिकार अर्ज़ात उत्तर देताना कोविड वैक्सीनमुळे कोणत्याही प्रकारचे विपरीत परिणाम किंवा जीवहानी झाल्यास शासनाची कोणतीही जवाबदारी नाही व त्यासाठी उपचार व नुकसान भरपाई विषयी कोणतेही प्रावधान करण्यात आलेले नाहीत अशी धक्कादायक माहिती दिल्याने शासनाला आपल्या वैक्सिनवरच भरोसा नाही का ? असा जनसामान्य मध्ये प्रश्न निर्माण झाला आहे .
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघचे राज्य कार्याध्यक्ष शेखऱ कोलते यांनी केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण मंत्रालयमध्ये माहितीचा अधिकार अर्ज करून कोविड वैक्सीन घेतल्यामुळे काही विपरीत परिणाम किंवा मृत्यु झाल्यास पीड़ित आणि त्यांच्या कुटुंबियाना शासनाद्वारे निशुल्क उपचार , नुकसान भरपाई , आर्थिक मदत , सुविधा , सवलत किंवा काही योजनाची तरतूद संबंधी माहिती मागितली होती . यावर केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण मंत्रालयच्या कोविड 19 लसिकरण प्रशासन सेलच्या (CVAC) जनमाहिती अधिकारी यांनी उत्तर स्वरुपात माहिती दिली की , कोविड वैक्सीन ही सुद्धा अन्य लस व उत्पाद सारखेच आहे ,ज्यांचे काही प्रतिकूल व विपरीत परिणाम सुद्धा होवू शकतात . ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) द्वारे योग्य चर्चा व सुरक्षा डेटा वर विचार करूनच अन्य औषधी सारखेच अश्या वैक्सीनला सुद्धा लायसेंस दिल्या जाते . सोबतच अश्या वैक्सीन घेतल्यामुळे काही विपरीत परिणाम किंवा मृत्यु झाल्यास पीड़ित आणि त्यांच्या कुटुंबियानाला शासनाद्वारे निशुल्क उपचार , नुकसान भरपाई , आर्थिक मदत , सुविधा , सवलत किंवा काही योजनाची कोणतीही तरतूद शासनाद्वारे करण्यात आली नाही .फक्त अश्या लसिकरण (AEFI) मुळे काही गंभीर परिणाम किंवा गंभीर घटना झाल्यास त्या पीड़ितवर शासकीय रुग्णालयात निशुल्क उपचार केले जातात ,अशी माहिती देण्यात आली
शेखऱ कोलते यांच्या अन्य एका माहितीचा अधिकार अर्ज़ात उत्तर देताना केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण मंत्रालयने कोविड वैक्सीन घेणे किंवा न घेणे ही ऐच्छिक बाब असल्याचा खुलासा केला आहे . अर्थात कोविड वैक्सीन घेण्यास कुणीही दबाव टाकू शकत नाही व सख्ती करू शकत नाही , कोविड वैक्सीन न घेतल्यास शासनांचे कोणतेही लाभ, सुविधा , सवलत, संधी, योजनाचे लाभ बंद होणार नाही किंवा त्यापासुन वंचित केले जाणार नाही . कोविड वैक्सीन घेतल्याने कोणतेही प्रतिकूल व विपरीत परिणाम झाल्यास शासन कोणतीही जवाबदारी घेत नाही आहे . परंतु कोविड वैक्सीन सुरक्षित असल्याचे शासनाद्वारे सांगितल्या जात आहे . सध्या कोविड वैक्सीन मुळे दुष्परिणाम व विपरीत परिणाम झाल्याच्या एकही घटना समोर आल्या नाहीत , अशी कोलते यांनी मांहिती दिली आहे .