Published On : Fri, May 7th, 2021

महाराष्ट्रात येणारे ऑक्सिजन टँकर्स गुजरातला पळवण्याचा कट उघड

Advertisement

नागपूर: महाराष्ट्रात कोरोना (Corona) बाधितांच्या वाढत्या संख्येसोबतच वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा (Oxygen Shortage) निर्माण झाला. यामुळे राज्याने विविध ठिकाणांहून ऑक्सिजन मागवण्यास सुरूवात केली. मात्र, असे असताना महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन (Maharashtra Oxygen) गुजरातला (Gujarat) पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

भिलाई येथून महाराष्ट्रातील नागपूरला वैद्यकीय ऑक्सिजन घेऊन चार टँकर्स येत होते. मात्र, हे टँकर्स गुपचूप गुजरातच्या दिशेने नेत असल्याचा प्रकार समोर आला. 5 मे रोजी दोन ऑक्सिजन टँकर्स गोंदिय जिल्ह्यातील देवरी बॉर्डरवर पकडण्यात आले तर 6 मे रोजी दोन टँकर्स औरंगाबाद आणि जालना या दरम्यान पकडण्यात आले आहेत. आता चारही ऑक्सिजनचे टँकर्स हे नागपूर प्रशासनाने ताब्यात घेतले आहेत.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महाराष्ट्रासोबतच गुजरातमध्ये सुद्धा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. यामुळे तेथेही वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, असे असले तरी महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन तेथे कुणाच्या सांगण्यावरुन नेण्यात येत होता असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement
Advertisement