Published On : Thu, May 6th, 2021

महावितरणच्या २ लाखांवर ग्राहकांचा वीजमीटर रिडींग पाठविण्यास प्रतिसाद

Advertisement

नागपूर : स्वतःहून मीटरचे रिडींग पाठविण्यास वीजग्राहकांकडून प्रतिसाद वाढत आहे. गेल्या एप्रिल महिन्यात २ लाख २ हजार ७४२ ग्राहकांनी मोबाईल अॅप, वेबसाईट व ‘एसएमएस’द्वारे मीटरचे रिडिंग महावितरणकडे पाठविले आहे. यामध्ये नागपूर परिमंडळातून ७२६९, अकोला- ७१८०,तर पुणे परिमंडलातील सर्वाधिक ४९९५० तर त्यापाठोपाठ कल्याण परिमंडलातील २८९१६ वीजग्राहकांचा समावेश आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या सूचनेनुसार वीजग्राहकांना स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. वीजग्राहकांचा प्रतिसाद पाहून ही सोय कायम ठेवण्यासोबतच मीटर रिडींग पाठविण्याची मूदत देखील चार दिवस करण्यात आली आहे. दरम्यान कोरोना प्रादुर्भावाच्या आपत्कालिन परिस्थितीत आता मोबाईल ‘एसएमएस’द्वारे देखील मीटर रिडींग पाठविण्याची खास सोय उपलब्ध आहे. याआधी मागील मार्च महिन्यात १ लाख३५ हजार २६१ ग्राहकांनी मीटर रिडींग पाठविले होते. या ग्राहकांमध्ये एप्रिल महिन्यात ६७ हजार ४८१ संख्येने वाढ झाली आहे.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजजोडणीच्या मीटरचे फोटो रिडींग घेण्यात येत आहे. ग्राहकांना मीटरच्या रिडींगसाठी दरमहा निश्चित तारखेच्या एक दिवसआधी रिडींग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे विनंती करण्यात येत आहे. तेव्हापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाईल अॅप, www.mahadiscom.inकिंवा‘एसएमएस’द्वारे मीटरमधील केडब्लूएच (kWh)रिडींग पाठविता येत आहे. गेल्या एप्रिल महिन्यात राज्यातील २ लाख २ हजार ७४२ ग्राहकांनी स्वतःहून मीटर रिडींग पाठविलेले आहे. यात पुणे परिमंडलमधील ४९९५०, कल्याण- २८९१६, नाशिक- २२३३०, भांडूप- १८०९३, बारामती- १३७३३, जळगाव- १०८७७, औरंगाबाद- १०१००, कोल्हापूर- ८४७०, नागपूर- ७२६९, अकोला- ७१८०, लातूर- ६०८५, अमरावती- ५६६२, कोकण- ४२२३, गोंदिया- ३४६४, नांदेड- ३२६२ व चंद्रपूर परिमंडलातील ३१३८ वीजग्राहकांचा समावेश आहे.

महावितरण मोबाईल अॅपमध्ये ‘सबमीट मीटर रिडींग’वर क्लिक करून मीटरमधील केडब्लूएच (kWh) रिडींगचा (केडब्लू किंवा केव्हीए वगळून) फोटो काढावा व सबमीट करावे. तसेच ग्राहक क्रमांकासोबत ग्राहक रजिस्ट्रेशन व लॉगीन करून www.mahadiscom.in वेबसाईटवरून फोटो व मीटर रिडींग अपलोड करता येईल. यासोबतच ‘एसएमएस’द्वारे मीटर रिडींग पाठविण्यासाठी MREAD<स्पेस><12 अंकीग्राहकक्रमांक><स्पेस>असा‘एसएमएस’ ९९३०३९९३०३ या मोबाईल क्रमांकावर पाठविल्यास मीटर रिडींग सबमीट करता येईल.

वीजग्राहकांना स्वतःहून रिडींग पाठविल्यास मीटरकडे व रिडिंगकडे नियमित लक्ष राहील. वीजवापरावर देखील नियंत्रण राहील. रिडींगनुसार बिल आल्याची खात्री करता येईल. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तत्काळ तक्रार करता येईल. वीजबिलांबाबत कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत. रिडींग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येईल. शंका समाधानासाठी तक्रार करता येईल.रिडींग पाठविण्यासाठी प्रत्येक महिन्यात केवळ दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागतो. यासह विविध फायद्यांमुळे वीजग्राहकांनी दरमहा मीटर रिडींग पाठवावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

Advertisement
Advertisement