Published On : Thu, Apr 22nd, 2021

कामठी तालुक्यात शेती मशागतीला आला वेग

Advertisement

कामठी :-कोरोनाचे संकट असले तरी कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यास दूर ठेवत रखरखत्या उन्हात शेती कामे करण्यास सुरुवात केली आहे.अवघ्या महिनाभरात पेरणी करावी लागणार असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागात शेती मशागतीला वेग आल्याचे दिसत आहे.

मागील तीन वर्षापसून सतत दुष्काळ , वादळी वाऱ्यासह गारपीट याप्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे तालुक्यातील शेतकरी राजा होरपळून गेला होता तर यावर्षी कोरोनाशी झुंज देत शेतकरी राजा एका नव्या उमेदीने शेती कामात व्यस्त झाला आहे .लॉकडोउन संपेल की वाढेल अशा संकटाशी झुंज देत शेतकरी पुन्हा खरिपाच्या पेरणीचे नियोजन करीत असल्याचे दिसून येत आहे .सध्या उन्हाचा पारा वाढला असला तरी बळीराजा, नांगरणी, वखरणी, शेणखत टाकणे, काटेरी झुडपे तोडणे, बांध दुरुस्ती आदी कामात मग्न झाला आहे.कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला जोडधंदा तथा पुरेशी सिंचन व्यवस्था नसल्याने येथील शेतकऱ्यांना खरीप हंगामावर जास्त प्रमाणात अवलंबून राहावे लागते त्यामुळे येथील शेतकऱ्यावर सतत कर्जाचा डोंगर उभा झाला आहे

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यातच या कोरोनाचा प्रकोपात शासनाकडून लावण्यात आलेल्या लॉकडॉउन व कडक निर्बंध यामुळे शेतकरी राजा मेटाकुटीस आला आहे.तरीसुद्धा कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा शेतीचा जुगार खेळण्याकरिता कंबर कसली असून त्यांनी शेती मशागतीच्या कामाला वेग दिला आहे.शेतकरी शेती मशागतीच्या कामाला लागला असतानाच रासायनिक खतांच्या किमती गगनाला भिडल्याचे दिसून येत आहे.मात्र त्या तुलनेत शासनाने शेत मालाचे हमी भाव वाढविले नाही .खरे पाहता शेतकऱ्यांचा आज पर्यंत शासनाच्या हमी भाव मृगजळच ठरत आला आहे.शेती साहित्य, बी बियाणे, रासायनिक खत, किटनाशकासह आता तर शेतात काम करणाऱ्या सालगडयाचे सुद्धा भाव वधारल्याने उत्पादन खर्चाच्या तुलनेत हमी भाव नगण्यच म्हणावा असा आहे.

मागिल वर्षीच्या लॉकडाउन मध्ये सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले होते तसेच आर्थिक नियोजन बिघडले होते तर शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असल्याने आर्थिक विवंचनेत अडकला होता त्यामुळे अनेक शेतकऱ्याकडे सध्या पीक असले तरी खर्चासाठी नगदी रकमेची उणीव जाणवत होती.शेती कामे करण्यातही अडचणी निर्माण झाल्या होत्या .मात्र यावर्षी सुदघा असलेल्या मागील वर्षीच्या लोकडॉउनच्या स्थितीत शेतकऱ्यांची मागचया वर्षीचिंच स्थिती आहे.अनेक शेतकऱ्याच्या घरात कापूस, सोयाबीन , तूर, हरभरा यांची विक्री न झाल्यामुळे वार्षिक ताळमेळ बिघडत असून आर्थिक व्यवहरासाठी लागणाऱ्या रकमेसाठी कसरत करावी लागत आहे .शेतीसंबंधी वस्तू खरेदी करण्यातही अडचणी येत आहे .कोरोनामुळे संचारबंदी व लॉकडोउन असले तरी तोंडावर येत असलेला खरीप हंगामासाठी कोरोनाला दूर ठेवत शेतकरी शेत मशागतीची जोरदार तयारी करीत असल्याचे चित्र कामठी तालुक्यात पाहावयास मिळत आहे.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement
Advertisement