Published On : Thu, Apr 22nd, 2021

ब्रेक दी चेन : २३ एप्रिल २०२१ पासून पुढील आदेशापर्यंत मेट्रो ट्रेनच्या वेळेमध्ये खालील प्रमाणे बदल करण्यात आले

नागपूर : ऑरेंज आणि ऍक्वा लाईन मार्गिकेवर प्रवासी सेवा उद्या पासून ३० मिनिटाच्या ऐवजी दर १ तासाने उपलब्ध असेल ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार फक्त खाली दिल्या गेलेल्या व्यक्तींनाच मेट्रोने प्रवास करता येईल.

•सर्व शासकीय कर्मचारी (राज्य / केंद्र / स्थानिक) शासनाने दिलेल्या ओळखपत्राच्या आधारे प्रवेश दिला जाईल

•सर्व वैद्यकीय कर्मचारी (डॉक्टर / पॅरामेडिक्स / लॅब तंत्रज्ञ / रुग्णालय आणि वैद्यकीय क्लिनिक कर्मचारी इ.) संबंधित वैद्यकीय संस्थेने जारी केलेल्या ओळखपत्राच्या आधारे प्रवेश दिला जाईल

•वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असणारी कोणतीही व्यक्ती किंवा विकलांग व्यक्ती आणि गरजू लोकांबरोबर एक व्यक्ती.