Published On : Thu, Apr 22nd, 2021

सर कस्तुरचंद डागा बाल सदन अनाथलयातुन दोन अल्पवयीन मुलांची पळवणूक

कामठी :-बालकल्याण समितीच्या आदेशान्वये आई वडिलांनी सोडून दिलेले 6 ते 12 वर्षे वयोगटातील बालके हे कामठी रेल्वे स्टेशन समोरील सर कस्तुरचंद डागा बाल सदन अनाथालयात वास्तव्य करीत असून सद्यस्थितीत या अनाथलयात 24 बालक वास्तव्यास आहेत .या अनाथलयातून बालके पळून जाण्याच्या घटना ह्या काही नव्याने राहल्या नसून बहुधा या प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत तर पोलिसांच्या मदतीने शोध घेऊन पळ काढलेल्या बालकांना पुनःश्च पूर्ववत ठिकाणी आणण्यात आले आहेत याच घटनेला अनुसरून काल 19 एप्रिल ला सायंकाळी 5 ते 6.30दरम्यान अनाथालयातील बालके हे

अनाथलयाच्या मैदानात खेळत असता अचानक दोन बालके दिसेनासे झाले.यासंदर्भात अनाथालय प्रशासन च्या वतीने रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणी शोध घेऊनही कुठेही थांगपत्ता लागला नसल्याने शेवटी कुणीतरी या बालकांना पळवून नेल्याची शंका व्यक्त करीत फिर्यादी परशुराम लूटे यांनी स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 363 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर पळवणूक झालेंल्या अनाथलयातील त्या बालकांचे नावे आदित्य शंकर पटेल वय 11 वर्षे रा सुदामनगर अंबाझरी नागपूर, जगदीश श्याम डेकाटे वय 11 वर्षे रा गुलशन नगर कळमना नागपूर असे आहे.