Published On : Thu, Apr 22nd, 2021

खंडोबा मंदिर रिंग रोड व रोप वे साठी ना. गडकरींनी केले 56 कोटी मंजूर

Advertisement

नागपूर: पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान मंदिर रिंगरोड व रोप वे मार्ग या कामांना केंद्रीय मार्ग निधीतून 56 कोटी रुपयांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली आहे. धामणटेक ते मंदिर, मंदिर निमगाव गावठाण ते दावडी व पुन्हा धामणटेक असा हा रिंगरोड आहे.

खंडोबा मंदिर पायथ्याशी सुसज्ज असे हेलिपॅड व रेस्ट हाऊस तसेच खंडोेबा मंदिर पायथ्याशी रोप वे, स्टेशनशेजारी बगिचा, स्वच्छतागृह, भक्त निवास,वृक्षारोपण तसेच मंदिर परिसरात हायमास्ट लाईट आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. खेड ते मंदिर खरपुडी मार्गे रस्ता व पिंपळगाव ते दावडी मार्गे मंदिर रस्ता हे देखील करण्यात येईल. रिंगरोडच्या कामांमुळे खंडोबा देवस्थान हे पुणे-नाशिक व पुणे नगर या दोन राष्ट्रीय महामार्गांनाा अत्यंत जवळच्या मार्गाने जोडले जाणार आहे.

Gold Rate
02 Aug 2025
Gold 24 KT 99,800 /-
Gold 22 KT 92,800/-
Silver/Kg ₹ - ₹- ₹1,11,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भीमाशंकर, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव हे अष्टविनायक व ज्योतिर्लिंग क्षेत्रे व यमाई देवस्थान, कनेरसर खंडोबा देवस्थानशी जवळच्या अंतराने जोडली जाणार आहेत. प्रस्तावित रोप वे मुळे वयस्कर व दिव्यांग लोकांना खंडोबा देवस्थानात देवदर्शन सहज शक्य होणार आहे. या कामांमुळे खेड तालुक्यातील पर्यटन, औद्योगिक व कृषी क्षेत्राच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे.

Advertisement
Advertisement