Advertisement
कामठी :-श्री.रामनवमी निमित्त चे औचित्य साधून आज 21 एप्रिल ला औचित्य साधून कामठी शहरातीक गुड ओली स्थित प्रभु श्री.परशुराम भगवान भवन येथे मोफत अँटिबॉडी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याशिबिरात 38 तरुणांनी स्वेच्छेने मोफत अँटिबॉडी तपासणी केले.हे शिबीर लाईफ लाईन ब्लड बँक चे आरोग्य कर्मचारी तसेच कामरान जाफरी यांच्या सहकार्याने तसेच कामठी शहरातील जागृत नागरिक समिती च्या वतीने आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात तपासणीत अँटिबॉडी चा स्कोर 10 च्या वर येत असेल तर त्यांचा प्लाज्मा जरूरतमंद ला देण्यात येईल.
या मोफत अँटिबॉडी तपासणी शिबिरात कपिल गायधने,कुणाल सोलंकी,कमलेश शर्मा,पंकज वर्मा,हरीश गायधने, विजय कोंडुलवार, मनोज यादव,संदिप यादव,सुनील नागपुरे आदींनी मोलाची भूमिका साकारली.
Advertisement