त्या बाळाने संघर्ष करत ९ तास उपचार सुरू असताना मृत्यू!
रामटेक : ग्राम पंचायत खैरी,बिजेवाड़ा परिसरात विकास मेश्राम यांच्या घराजवळ अज्ञात व्यक्तीने नूकताच जन्मलेला नवजात बाळाला ला फेकून दिले.
अतिशय गंभीर अवस्थेत तो बाळ ग्राम पंचायत खैरी बिजेवाड़ा वाहिटोला परिसरात आढळून आला.
या घटने ची माहिती तिलक रौतेल यांनी सरपंच ऊर्मिला खुडसाव यांना दिली.माहिती मिळताच सरपंच उर्मिला खुडसाव यांनी लगेच किमया हॉस्पिटल शितलवाडी येथे त्या बाळाला उपचाराकरिता धाव घेतली व रामटेक पोलीस स्टेशन ला सदर घटनेची माहिती दिली. बाळ गंभीर अवस्थेत आढळला तेव्हा बाळ श्वास घेत होता व त्याला नाकाला व ओठाला जखम लागली होती.
किमया हॉस्पिटल येथील डॉ.निनाद पाठक यांनी नवजात बाळावर 9 तास उपचार करुण सर्वतोपरी प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला , ९ तास त्या बाळाने संघर्ष केला, परंतु बाळ वाचला नाही. अशी माहिती खैरी बिजेवाडा येथील सरपंच उर्मिला खडसाव यांनी दिली.
ह्या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्या बाळाने आजुन या जगात आपल्या नाजूक पायांनी एक पाहुलही टाकलं नव्हत, नवजात बाळाला रस्त्यावर कोणी फेकून दिलं असेल. अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास रामटेक पोलिस करीत आहे.