Published On : Thu, Feb 18th, 2021

एअरपोर्ट ते एअरपोर्ट मेट्रो स्टेशन दरम्यान शटल बसचे उद्घाटन

Advertisement

– मेट्रोच्या वर्धापन दिनापासून शटल बस फीडर सेवेचा शुभारंभ

नागपूर – आज महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाचा ६ वा वर्धापन दिवस साजरा करीत असतांनाच नागपूर विमानतळ ते एअरपोर्ट मेट्रो स्थानकापर्यंत फीडर सेवा म्हणजे शटल बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला. महा मेट्रो, नागपूर महानगर पालिका व मिहान इंडिया लिमिटेड च्या संयुक्त विद्यमानाने एयरपोर्ट मेट्रो स्टेशन ते डॉ. बाबासाहेब आंतराराष्ट्रीय विमानतळ व डॉ. बाबासाहेब आंतराराष्ट्रीय विमानतळ ते एयरपोर्ट मेट्रो स्टेशन पर्यंत हि सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे.महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संस्थापक डॉ. ब्रिजेश दीक्षित ह्यांनी फित कापून या बस सेवेचे उद्घाटन केले. या प्रसंगी वरिष्ठ एअरपोर्ट संचालक अबिद रूही, यशवंत सरातकर (चीफ सिक्युरिटी ऑफिसर & एचओडी कार्गो), सुरज शिंदे मिहान अधिकारी आणि महा मेट्रो नागपूरचे कार्यकारी संचालक (प्रशासन) श्री. अनिल कोकाटे, महाव्यवस्थापक (ऑपरेशन आणि मेंटेनन्स) श्री सुधाकर उराडे, सह महाव्यवस्थापक (फिडर सर्व्हिस) श्री महेश गुप्ता तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Gold Rate
23 dec 2025
Gold 24 KT ₹ 1,36,300/-
Gold 22 KT ₹ 1,26,800/-
Silver/Kg ₹ 2,10,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विमानतळावर उतरणाऱ्या नागरिकांना किंवा विमानतळावर जाण्यासाठी शहरभरातुन मेट्रोने प्रवास करून आलेल्या प्रवाश्यांसाठी आता हा प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होणार आहे. ही शटल बस दर पंधरा मिनिटांनी या मार्गावर फेऱ्या मारणार आहे. सदर बस ही इलेक्ट्रिक बस असून यामध्ये मोठ्या प्रमाणात सामान ठेवण्याकरता जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या सामानासह सहजपणे विमानतळ पर्यंत पोहचता येईल. एयरपोर्ट मेट्रो स्टेशन ते विमानतळ पर्यंत इलेक्ट्रिक बसचे तिकीट दर हे शासकीय दरानुसार असेल. ही शटल बस सेवा सकाळी ८ वाजता पासून रात्री ८ वाजता पर्यंत नागरिकांकरिता उपलब्ध असेल.स्वच्छ, सुरक्षित,वातानुकूलित,आरामदेय व पर्यावरणपूरक मेट्रोचा व फिडर सर्विसचा उपयोग करून प्रदूषण कमी करण्यास नक्कीच मदत होईल.

खापरी मेट्रो स्टेशन ते मिहान मेट्रो रेल फिडर सर्विस :
या व्यतिरिक्त महा मेट्रो आणि इंडिया पॅसिफिक ट्रॅव्हल्सच्या संयुक्त विद्यमाने खापरी मेट्रो स्टेशन ते मिहान परिसर दरम्यान मेट्रो रेल फिडर सर्विस आज दि. १८ फेब्रुवारी २०२१ पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आली आहे. महा मेट्रोने इंडिया पॅसिफिक ट्रॅव्हल्स कंपनी सोबत सामंजस्य करार केला असून मिहान परिसरात विविध कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त संख्येत मेट्रो रेल प्रकल्पाशी जोडण्याचा महा मेट्रोचा प्रयत्न आहे. नागपूर महानगर पालिकेला महा मेट्रो ने शहरातील ७ मार्गावर १८ बस सेवा सुरु करण्या संबंधी प्रस्ताव दिला असून त्या प्रस्तावाला लौकरच मंजूरी मिळण्याची शक्यता आहे.

खाली दिल्याप्रमाणे मेट्रो रेल फिडर सर्विस कार्यरत असेल :
• खापरी मेट्रो स्टेशन ते एम्स हॉस्पिटल,कॉनकोर,एचसीएल,टीसीएस,मिहान येथील डब्ल्यू इमारत,ल्युपिन, हेक्सावेयर इत्यादी कंपनी परिसरापर्यंत फिडर सर्विस उपलब्ध असेल.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement