सात दिवसात २९८३ विरुध्द कारवाई
नागपूर : नागपूरात कोरोनाच्या उद्रेक झाला असून बाधीत व मृतांची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. तरीसुध्दा नागरिक मास्क शिवाय फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मास्क न घातल्याबददल रु २००/- दंड आकारण्यात येत आहे.
महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवारी (१० सप्टेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ५४१ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून १ लक्ष ८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील सात दिवसात शोध पथकांनी २९८३ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. ५,९६,६००/- चा दंड वसूल केला आहे.
लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ४५, धरमपेठ झोन अंतर्गत १०२, हनुमाननगर झोन अंतर्गत ४२, धंतोली झोन अंतर्गत ६५, नेहरुनगर झोन अंतर्गत ३३, गांधीबाग झोन अंतर्गत ३४, सतरंजीपूरा झोन अंतर्गत ४५, लकडगंज झोन अंतर्गत ३३, आशीनगर झोन अंतर्गत ५३, मंगळवारी झोन अंतर्गत ८५ आणि मनपा मुख्यालयात ४ जणांविरुध्द गुरुवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
आतापर्यंत सात दिवसात लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २०५, धरमपेठ झोन अंतर्गत ७३५, हनुमाननगर झोन अंतर्गत २२८, धंतोली झोन अंतर्गत ३२२, नेहरुनगर झोन अंतर्गत १८०, गांधीबाग झोन अंतर्गत २०८, सतरंजीपूरा झोन अंतर्गत १८१, लकडगंज झोन अंतर्गत १८२, आशीनगर झोन अंतर्गत २९३, मंगळवारी झोन अंतर्गत ४१९ आणि मनपा मुख्यालयात ३० जणांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.