Published On : Sat, Aug 22nd, 2020

जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांची बदली

Advertisement

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांची बदली झाली आहे. नागपूर येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून ते सोमवारपासून रुजू होणार आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून प्रवीण टाके हे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून चंद्रपूर येथे कार्यरत होते. शासन-प्रशासन व सामान्य माणूस यांच्यातील संपर्क व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे काम त्यांनी या तीन वर्षात केले. राज्य शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स आणि सोशल माध्यमांचा प्रभावी वापर त्यांनी केला.

Gold Rate
25 July 2025
Gold 24 KT 99,000 /-
Gold 22 KT 92,100 /-
Silver/Kg 1,15,700 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यासोबतच आकाशवाणी चंद्रपूरवरून अनेक प्रायोजित कार्यक्रमांमार्फत त्यांनी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. लोकसभा व विधानसभा निवडणूक काळातील माध्यमांचा संपर्क आणि कोरोना काळामध्ये सामान्य जनतेला प्रशासनाकडून येणाऱ्या सूचना इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमार्फत पोहोचविण्यासाठी अतिशय प्रभावी पद्धतीने त्यांनी या काळात काम केले.

शनिवारी माध्यम क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय क्षेत्रातील ज्येष्ठ अधिकारी यांनी एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांना निरोप दिला.नागपूर येथे सोमवारपासून ते रुजू होणार आहे.

Advertisement
Advertisement