Published On : Sat, Aug 22nd, 2020

माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या घरी आज श्री. गणरायाची स्थापना करण्यात आली.

कोरोनाला हद्दपार करून जनतेला सुखी कर, असे साकडे त्यांनी गणरायाला घातले असून या विषाणूचे संक्रमण थांबावे म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी व सुरक्षित रहावे, असे आवाहन त्यांनी सर्वांना केले आहे.

कोरोना परिस्थितीमुळे त्यांचे वडील मा. श्री. रणजीतबाबू देशमुख व आई सौ. रूपाताई देशमुख यांनी व्हिडीओ कॉलद्वारे श्री. गणेशाच्या स्थापनेत सहभाग घेतला.