Published On : Thu, Aug 20th, 2020

स्वच्छ भारत सर्वेक्षणात नागपूर १८ व्या क्रमांकावर

नागपूर :- केंद्र शासनाकडून स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ भारत सर्वेक्षण जानेवारी २०२० मध्ये करण्यात आले होते. या सर्वेक्षणात नागपूर शहराने १८ वा क्रमांक पटकावला आहे. मागच्या वर्षीचे सर्वेक्षणात नागपूर हे ५८ व्या क्रमांकावर होते. या वर्षी रँकिंगमध्ये नागपूर शहराने मोठी भरारी घेतली आहे. केंद्र शासनाचे गृह निर्माण आणि शहर विकास मंत्री मा. श्री. हरदीप सिंह पुरी यांनी दिल्लीमध्ये सर्वेक्षणाचा निकाल घोषित केला.

गृह निर्माण आणि शहर विकास मंत्रालयाव्दारे घोषित केलेल्या निकालानुसार महाराष्ट्रातील १० शहरांपैकी नागपूर शहर हे पाचव्या क्रमांकावर घोषित करण्यात आले आहे. नागपूरला ४३४५ गुण स्पर्धेमध्ये प्राप्त झाले आहे. नागपूर शहराला सर्व्हीस लेवल प्रोग्रेस मध्ये १५०० पैकी १२०८, सर्टिफिकेशन मध्ये १५०० पैकी ५००, प्रत्यक्ष निरीक्षण मध्ये १५०० पैकी १३५४ आणि नागरिकांचे प्रतिसाद श्रेणी मध्ये १५०० पैकी १२८३ गुण मिळाले आहे. नागपूरला मागील वर्षी ६३.२२ टक्के गुण भेटले होते यावर्षी ७२.४ टक्के गुण प्राप्त झाले आहे.

Gold Rate
27 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,100 /-
Gold 22 KT ₹ 1,06,100 /-
Silver/Kg ₹ 1,43,400/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महापौर श्री. संदीप जोशी यांनी नागपूरचा स्वच्छ भारत सर्वेक्षणात १८ वा क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल नागपूर मनपाचे सर्व अधिकारी व कर्मचा-यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी सांगितले की, तत्कालीन आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वा खाली आरोगय विभागासह मनपाचे सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी नागपूर शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष मेहनत घेतली होती या सर्वांचे महापौरांनी अभिनंदन केले आहे.

त्यांनी सांगितले की स्वच्छते साठी “मम्मी पापा यू टू” मोहिम हाती घेण्यात आली होती. या अभियानात तीन लाख शालेय विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. यावर्षी सुध्दा मनपाची टीम चांगले कार्य करुन नागपूरचे रँकिंग पुढे नेण्याचा प्रयत्न करावे असे आवाहन महापौरांनी केले आहे. मनपा आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी देखील मनपाच्या टीमचे अभिनंदन करुन नागपूरचे रँकिंग अधिक चांगले होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

Advertisement
Advertisement