Published On : Wed, Jul 29th, 2020

बकरी ईदला मुस्लिम बांधवांनी घरीच नमाज अदा करण्याचे आव्हान- तहसीलदार

Advertisement

कामठी :-येत्या 1 ऑगस्ट ला मुस्लिम समाजबांधवांचा सर्वात मोठा सन मानला जाणारा बकरी ईद हा पर्व साजरा होणार आहे.दरवर्षी मुस्लिम समाजबांधव या बकरी ईद च्या दिवशी कामठी शहरातील रबबानी मैदान इदगाह तसेच चर्च मैदान ईदगाह मध्ये एकत्र येऊन ईदगावहवर ‘ईद -उल-अजहा ची सामूहिक नमाज अदा करतात मात्र सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या प्रदूर्भावा मुळे सामूहिक संसर्गातुन पसरत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुस्लिम समाजबांधवांनी बकरी ईद हा पर्व साध्या पद्धतीने साजरा करीत घरीच नमाज अदा करण्याचे आव्हान तहसीलदार अरविंद हिंगे यांनी बकरी ईद च्या पर्वावर कामठी पोलीस विभागाच्या वतीने रणाळा येथील पंकज मंगल सभागृहात आयोजित शांतता कमिटी च्या बैठकीत केले .

याप्रसंगी डीसीपी निलोत्पल, एसडीओ श्याम मदनूरकर, एसीपी मुंडे, परिक्षाविधीन तहसोलदार जितेंद्र शिकतोडे, एसीपी मुंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे, पोलीस निरीक्षक आर आर पाल प्रामुख्याने उपस्थित होते.

Gold Rate
06 May 2025
Gold 24 KT 97,000/-
Gold 22 KT 90,200/-
Silver/Kg 96,900/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कामठी शहर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरले असताना आगामी काळात खबरदारी घेणे नितांत गरजेचे आहे, अत्यावश्यक असल्यास घराबाहेर पडा अन्यथा घरातच सुरक्षित राहा .आगामी बकरी ईद सणादरम्यान कुठल्याही प्रकारची गर्दी न करता गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये , शासनाच्या नियमांचे पालन करून सॅनिटायझर, मास्क वापरणे यांच्यासह ईद ही साध्या पद्धतीने वापर करण्याचे समयोचित आव्हान उपस्थित समस्त अधिकारी वर्गानी केले. दरम्यान हा बकरी ईद पर्व कोरोनाच्या प्रदूर्भावाचा नोयंत्रण साधुन कसा पार पाडता येईल यासाठी उपस्थित नागरिकांशी सकारात्मक चर्चा करोत समाधान व्यक्त करण्यात आले. या सभेचे संचालन वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांनी केले तर आभार पोलीस कर्मचारी समाधान पांढरे यांनी मानले.

बॉक्स:- बकरी ईद ‘ईद -उल -अजहा’ही बलिदानाची ईद आहे .मुस्लिम मान्यतेनुसार हजरत इब्राहिम यांनी आपले पुत्र हजरत इस्माईल यांना याच बकरी ईद च्या दिवशी अल्लाहच्या आदेशानुसार अल्लाहासाठी बलिदान देण्यासाठी जात होते मात्र अल्लाहणे हजरत इस्माईल लास जीवनदान दिले त्याच त्याग आणि बलिदानाचा समूर्ती प्रित्यर्थ हा दिवस बकरी ईद म्हणून साजरा केला जातो या दिवशी कुर्बाणीला विशेष महत्व आहे या दिवशी कुर्बानी दिली जाते व गरिबांना अन्नदान दिले जाते.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement