Published On : Wed, Jul 29th, 2020

कामठी तालुक्यात 89 टक्के खरिपाची लागवड

कामठी तालुक्यात 20 हजार 277 हॅकटर वर खरिपाची लागवड
पाऊसमान चांगले असल्याने पीक परिस्थिती समाधानकारक

कामठी :-यावर्षीच्या कोरोना संकटाच्या पाश्वरभूमीवर सर्वसामान्यांसह राजकीय वर्तुळाच्या नजरा मान्सून कडे लागल्या होत्या यंदा मान्सूनने वेळेवरच पावसाची हजेरो लावल्याने जूनच्या मधातल्या आठवड्यात कामठी तालुक्यात खरीपाच्या पेरणीचा श्रीगणेशा झाला .कामठी तालुक्यातील 22 हजार सर्वसाधारण क्षेत्रापैकी 89 टक्के म्हणजे 2 हजार 277 हॅकटर वर खरिपाची पेरणी करण्यात आली यानुसार यावर्षी कामठी तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रात धानाची तर निम्म्या प्रमाणात सोयाबीन व त्यापेक्षा अधिक क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली .

यंदाच्या खरीप हंगामात कामठी तालुक्यात केलेल्या खरीप लागवड नुसार धान रोवणी 7542 हॅकटर, पेरिव धान 349 हॅकटर असा एकूण 7891 हॅकटर क्षेत्रात धान लागवड करण्यात आली, कापूस 5461 हॅकटर, सोयाबीन 3921 हॅकटर, ऊस 523 हॅकटर , भाजीपाला 719 हॅकटर असा एकूण 20 हजार 277 क्षेत्रात खरिपाची लागवड करण्यात आली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात जूनच्या मध्यापासून ते जुलै अखेरपर्यंत तालुक्यातील सभोवताल भागात कमी अधिक प्रमाणात योग्यवेळी पाऊस पडल्याने पीक परिस्थिती समाधान कारक असल्याचे दिसुन येत आहे या स्थितीत शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात पाहिलेल्या हिरव्या स्वप्नाची पूर्तता होण्याची आशा निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

संदीप कांबळे कामठी