Published On : Thu, Jul 16th, 2020

कन्हान शहर सात व ग्रामिण नऊ असे सोळा पॉझीटिव्ह

Advertisement

कन्हान शहर सह ग्रामिण मध्ये कोरोनाचा सिरकाव.

कन्हान : – कामठीच्या संपर्कातुन कन्हान-पिपरी शहरात सिरकाव होऊन दिवसेदिवस रूग्ण वाढुन कन्हान दोन, पिपरी- पाच ग्रामिण बोरडा-एक, कांद्री-पाच, टेकाडी कोळसा खदान – २ व कॉलोनी -एक असे एकुण सोळा कोरोना रूग्ण आढळल्याने परिसरात नियमाची काटेकोर पणे पालन करणे आवश्यक झाले आहे.

कामठीचा कोरोना पॉझीटिव्ह साळयाच्या संपर्कात आलेला दि.१३ जुलै ला ढिवर मौहला पिपरी (कन्हान) येथील जावई, कोरोना पॉझीटिव्ह प्रथम मिळाला. त्याच्या संपर्कातील १० घरच्या ५० लोकांची रॅपिट तपासणी केली अस ता ६५ वर्षिय म्हातारी, ४५ वर्षिय बहिण, ४ वर्षाचा बोरडा (गणेशी) येथील भाचा पॉझीटिव्ह आढळला. असे चार आणि खैरी कामठी येथिल मुर्ती कम्पनीत काम करण्या-याची कामठी तपासणीत पिपरी चा ४५ वर्षिय एक असे पाच.

दि १४ ला अशोक नगर कन्हान चा एक व रॅपेट तपासणीत पिपरीची ४२ वर्षीय महिला मिळाल्याने एकाच मौहल्यातील पाच कोरोना पॉझीटिव्ह दि १५ ला कांद्री येथील जि प अध्यक्षा रश्मी बर्वे चे पती सह आठ यात कांद्रीचे पाच, टेकाडी कोळसा खदान दोन, कॉलोनी एक व कन्हान एक असे नऊ रूग्ण मिळाल्याने तीन दिवसात कन्हान – २, पिपरी – ५, कांद्री – ५, टेकाडी कोळसा खदान – २ , कॉलोनी – १ व बोरडा (गणेशी) – १ असे एकुण सोळा रूग्ण कन्हान शहर व ग्रामिण मध्ये मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बुधवार ला रॅपेट टेस्ट – २५ व स्वॅब टेस्ट १८१ करण्यात आल्या.