Published On : Fri, Jun 5th, 2020

प्रत्येकाने किमान एक झाड लावावे : उपमहापौर मनिषा कोठे

Advertisement

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील हिरवळीवर वृक्षारोपन

नागपूर: आज पर्यावरण संवर्धनाप्रती प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे. निसर्ग आपल्याला भरभरून देत असताना आपणही निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे. आपले पर्यावरण संतुलीत राहावे यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन उपमहापौर मनीषा कोठे यांनी केले.

Gold Rate
04Oct 2025
Gold 24 KT ₹ 1,20,500 /-
Gold 22 KT ₹ 1,12,100 /-
Silver/Kg ₹ 1,48,900/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शुक्रवारी (ता.५) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मनपा मुख्यालयातील हिरवळीवर उपमहापौर मनीषा कोठे यांच्यासह विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, जैवविविधता समितीच्या अध्यक्ष दिव्या धुरडे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी वृक्षारोपन केले. पर्यावरणाच्या संरक्षणार्थ नेहमी पुढाकार घेऊन झाडे लावा, झाडे जगवा, आपले नागपूर शहर सुंदर, हिरवे व स्वच्छ करुया असा संदेश उपमहापौर मनीषा कोठे यांनी यावेळी दिला.

या प्रसंगी उपायुक्त तथा उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, उद्यान निरीक्षक अनंता नागमोते आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement