Published On : Sun, May 31st, 2020

पुण्यश्लोक अहिल्यादेवी मॉंसाहेबांचा राज्यकारभार माझ्यासह सर्व राज्यकर्त्यांना प्रेरणादायी व मार्गदर्शक – अजित पवार

Advertisement

मुंबई : – पुण्यश्लोक अहिल्यादेवी मॉंसाहेबांनी त्याकाळात घेतलेला प्रत्येक निर्णय व केलेलं प्रत्येक कार्य हे माझ्यासह, प्रत्येक राज्यकर्त्याला प्रेरणा, मार्गदर्शन देत राहील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले आहे.

राष्ट्रनिर्मात्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मॉंसाहेबांच्या जयंतीनिमित्ताने कृतज्ञतापूर्वक स्मरण करत असताना त्यांनी त्याकाळात भारतभर केलेल्या विकासकामांचा डोंगर नजरेसमोर उभा राहतो. प्रजाहितदक्ष राज्यकर्ता कसा असावा हे अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले होते असेही अजित पवार म्हणाले.

Gold Rate
26 July 2025
Gold 24 KT 98,300 /-
Gold 22 KT 91,400 /-
Silver/Kg 1,13,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्वत:च्या संस्थानाबाहेरही लोकहिताची कामे केली. देशात ठिकठिकाणी रस्ते, देवळं, विहिरी, तलाव, नदीघाट, धर्मशाळेसारख्या असंख्य सोयीसुविधा निर्माण केल्या. त्या आजही तितक्याच भक्कमपणे उभ्या आहेत. अहिल्यादेवींनी दूरदृष्टीने निर्माण केलेल्या या सोयीसुविधांनी देशवासियांच्या मनात राष्ट्रनिर्मितीची भावना रुजवण्याचे मोलाचे काम केले असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महान योद्धा होत्या. कुशल प्रशासक, न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष, दानशूर राज्यकर्त्या होत्या. मुलकी आणि लष्करी प्रशासन वेगळे करुन कुशल राज्यकारभाराची चुणुक त्यांनी दाखवली होती. महिलांच्या सक्षमीकरणाचे काम त्यांनी त्याकाळात केले. महिलांना शिक्षण, प्रशिक्षण, अधिकार दिले. शेतकऱ्यांवरील, व्यापाऱ्यांवरील अन्याय दूर करुन त्यांना प्रोत्साहन दिले. लोककला, कलावंतांना आश्रय दिला. उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्विकारले. अहिल्यादेवी महान राज्यकर्त्या होत्या, तितक्याच थोर विचारवंत होत्या. त्यांचे विचार सुधारणावादी, अंधश्रद्धेवर प्रहार करणारे होते. त्यांच्या विचारांचे, राज्यकारभाराचे कौतुक जगभरात होत आलं आहे. यातूनंच त्यांचं निर्विवाद श्रेष्ठत्व सिद्ध होते असेही अजित पवार यांनी सांगितले आहे.

अहिल्यादेवींच्या शौर्यं, पराक्रम, आदर्श राज्यकारभारामुळे मराठा साम्राज्याची किर्ती देशातच नव्हे तर जगभरात पोहोचली. याचंही स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी मॉंसाहेबांनी त्याकाळात घेतलेला प्रत्येक निर्णय व केलेले प्रत्येक कार्य हे माझ्यासह, प्रत्येक राज्यकर्त्याला प्रेरणा, मार्गदर्शन देत राहील असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.

Advertisement
Advertisement