करोनाच्या प्रादूर्भावामुळे शहरात लॉकडाऊन सुरू असून एकही सांस्कृतिक कार्यक्रम होताना दिसत नाही. त्यामुळे कलाकारांवर आर्थिक संकट कोसळले आहे. स्वाभिमानाने जगणाèया या कलाकारांना या संकटाच्या काळात आत्मसन्मानाचे जीणे जगण्याची संधी सेजल एंटरटेनमेंटच्या वतीने देण्यात आली.
कलाकारांना मदतीचा हात देणारे बरेच आहेत पण सेजल ग्रुपने त्यांना त्यांच्या कष्टाचा पैसा देत त्यांचा आत्मसन्मान राखला. त्याकरीता सेजल एंटरटेनमेंटच्यावतीने सुमधूर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सेजल एंटरटेनमेंट प्रस्तुत फेसबुक लाइव्ह सिजन 5 अंतर्गत सुपरहिट गीतांचा कार्यक्रम नुकताच पार पडला. संजय बोरकर यांच्या फेसबुक पेजवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला. यात संजय बोरकर, सेजल बोरकर व संदिप मलिक यांनी विविध सुमधूर गीते सादर केली. तर ध्वनी व्यवस्था राजू वाकोडकर यांनी आणि मंच सजावट सौम्य टिपले यांनी सांभाळली. मंगेश पटले यांनी आर्गन, सुभाष वानखेडे यांनी ऑक्टोपॅडवर,, अशोक टोकलवार यांनी ढोलकरवर गायक कलाकरांना उत्तम साथसंगत केली. कार्यक्रमाची संकल्पना प्रतिमा बोरकर यांची होती.
साची जोतो वाली माता भक्तीगीताने गायकांनी कार्यक्रमाची दमदार सुरुवात केली. आने से उनके आये बहार, खिलते है गुल यहां, आपकी आँखो मे, यारा ओ यारा, रोज रोज आँखों तले, ए री पवन, बडी दूर से आये है अशी एकाहून एक सरस गीते यावेळी गायकांनी सादर केली. साईबाबा बोलो या साईभक्तीगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.









