६९९ मजुरांच्या प्रवासभाड्याचा खर्च कॉंग्रेसने केला… डॉ.नितीन राऊत
नागपूर : देशभरात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना स्वगृही जाण्यासाठी काँग्रेसने प्रवासभाडे खर्च द्यावा असे ४ मे रोजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिले होते. त्याप्रमाणे, नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील वेगवेगळ्या ठिकाणी तसेच निवारागृहात वास्तव्यास असलेल्या उत्तरप्रदेश राज्यातील सुमारे ६९९ मजुरांचे प्रती व्यक्ती रेल्वे प्रवासभाडे खर्च रु.५०५/- प्रमाणे एकूण ३,५२,९९५/- इतका खर्च काँग्रेस पक्षाने करून ह्या सर्व मजुरांना स्वगृही जाण्यासाठी मोठा दिलासा दिल्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.
९ मे रोजी रात्री १० वाजता सुमारे ११५९ प्रवासी मजूर घेऊन नागपूरहून श्रमिक स्पेशल गाडी क्रमांक ०१९४३ उत्तरप्रदेशमधील लखनऊकडे रवाना झाली. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील ६९९ तर चंद्रपूर, गडचिरोली आणि हैदराबाद येथील ४६० प्रवाश्यांचा सहभाग होता. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी आणि महाराष्ट्र युवक काँग्रेस उपाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत ह्या गाडीला हिरवा कंदील दाखविण्यात आला.
यावेळी सदस्य राष्ट्रीय सल्लागार परिषद काँग्रेस सेवादल कृष्णकुमार पांडे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे महासचिव रामकिशन ओझा, म.प्र.काँग्रेस कमिटी प्रवक्ता संजय दुबे, नागपूर शहर काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष बंडोपंत टेंभूर्णे, नगरसेवक-दिनेश यादव, अ.भा.काँग्रेस कमिटी समन्वयक (अनुसूचित जाती विभाग) अनिल नगरारे, माजी सदस्य नागपूर शहर काँग्रेस कमिटी फिलीप जयस्वाल, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश (अनुसूचित जाती) राजेश लाडे, एन.एस.यु.आय. राष्ट्रीय उपाध्यक्ष अजित सिंग, नागपूर शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष धीरज पांडे, उत्तर नागपूर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सतीश पाली, ठाकूर जग्यासी, उपाध्यक्ष नागपूर शहर काँग्रेस कमिटी हरिभाऊ किरपाने, सलीम खान,सुरेश पाटील, दीपक खोब्रागडे, हनीफ सिद्दिकी, मन्सूर खान, मुलचंद मेहर आतिश साखरे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रवाश्यांच्या जेवणाची, पिण्याच्या पाण्याची सोय आणि सोबत फूड पॅकेट देण्यात आले. रेल्वे प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.