कामठी :-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त कामठी तालुक्यात ठिकठिकाणी सामूहिक अभिवादन वाहण्यात आले. याप्रसंगी कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लागू असलेल्या लॉकडॉऊन व प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे काटेकोर पालन करोत प्रशासनाला सहकार्य करीत आंबेडकरी समुदायानी घरीच जयंती साजरी केली.
तसेच कामठी तहसिल कार्यालयात तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या शुभ हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मारल्यार्पण करन्यात आले तसेच कामठी पंचायत समिती कार्यालयात ऊस तोडणी कामगार, शेतमजूर आदी जवळपास 150 गरजुना अन्न धान्य किट वितरण करण्याचा संकल्प करीत कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या लोकवर्गणीतून 150 अन्न धान्य किट जमा करण्यात आल्या.
कामठी नगर परिषद च्या वतीने मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या शुभ हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला मारल्यार्पण करून अभिवादन वाहण्यात आले तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन ला पोलीस निरीक्षक देविदास कठाळे, नवीन कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संतोष बाकल तसेच एसीपी कार्यालयात एसीपी राजरत्न बन्सोड यांच्या शुभ हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला मारल्यार्पण करून अभिवादन वाहण्यात आले तसेच विविध सामाजिक व राजकीय संघटनेच्या वतीने सोशल डीस्टिंग चा नोयम पाळत बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यात आली.