Published On : Wed, Apr 15th, 2020

जी प सदस्य अनिल निधान कडून 550 गरजूंना अन्न धान्य किट चे वितरण

कामठी :- 22 मार्च पासून कोरोना वायरस मुळे लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर बिकट परिस्थिती निर्माण झाली त्यात गोरगरिबांना, शेतमजूर कंपनी मध्ये काम करणारे मजूरांना दोन टाईमची जेवणाची व्यवस्था नव्हती अशा लोकांची व्यवस्था माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व आ.टेकचांद सावरकर ,जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते अनिल निधान यांच्या सहकार्याने गुमथळा महालगाव सर्कल मध्ये 550 किट तयार करण्यात आल्या त्या मध्ये 5 किलो तांदूळ 2 किलो कनिक 1 किलो तेल बेसन हळद तिखट अशा प्रकारे किट तयार करून संपूर्ण सर्कल मध्ये गरजु प्रयत्न पोहचविण्याचे काम कामठी तालुका अध्यक्ष किशोर बेले, कामठी मौदा विस्तारक नरेश मोटघरे ,महामंत्री कैलास महल्ले, युवा मोर्चा अध्यक्ष किरण राऊत ,कामठी समनवय योगेश डाफ, युवा महामंत्री लोकेश माळोदे ,सर्कल प्रमुख लक्षमन करारे ,गौरव तकीत ,पंकज राऊत , आशिष मनोहर आगलावे ,राहूल बोढारे ,कमलाकर ठाकरे ,सचिन डांगे निखिल पेठे यांच्या नेतृत्वाखाली वाटप करण्यात आला.

संदीप कांबळे कामठी