Published On : Sat, Apr 4th, 2020

Coronavirus Update Nagpur : मरकजहून आलेला रुग्ण पॉझिटिव्ह : नागपुरात बाधितांची संख्या १७

नागपूर : मरकजहून नागपुरात आलेल्या एका ३२ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे त्याच्या नमुन्याच्या अहवालावरून आज शनिवारी स्पष्ट झाले. या रुग्णासह नागपुरात बाधितांची संख्या १७ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे नागपूर ‘एम्स’ने आजपासून सुरू केलेल्या पहिल्याच तपासणीत हा रुग्ण पॉझिटिव्ह आला.

निजामुद्दीन तबलिगी मरकज हे कोरोना प्रसाराचे केंद्र बनले आहे. येथून सुमारे २००वर व्यक्ती नागपुरात आल्याचे सांगण्यात येते. १ एप्रिलपासून या सर्व संशयितांना आमदार निवास, वनामती व रविभवन येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे, शुक्रवारी आणि शनिवारी मरकजहून आलेल्या ७५ संशयितांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. परंतु ३२ वर्षीय युवकाचे नमुने पॉझिटिव्ह येताच खळबळ उडाली.

Gold Rate
10 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,09,600 /-
Gold 22 KT ₹ 1,01,900 /-
Silver/Kg ₹ 1,25,100/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मिळालेल्या माहितीनुसार, बाधित रुग्ण हा १३ मार्चला दिल्ली निजामुद्दीन मरकज येथील धार्मिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गेला होता आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे १४ मार्चला रेल्वेने नागपुरात परत आला. त्याला १ एप्रिल रोजी वनामती येथे क्वारंटाईन करण्यात आले. नमुना पॉझिटिव्ह येताच रुग्णाला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या १८ दिवसात बाधित रुग्ण कुठे कुठे गेला याची माहिती घेतली जात आहे. संपर्कात आलेल्यांना मेयो, मेडिकलमध्ये दाखल केले जाणार आहे. हा रुग्ण दाटीवाटीच्या वसाहतीतील रहिवासी आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेला पुढील काही दिवस मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

Advertisement
Advertisement