Published On : Mon, Mar 30th, 2020

गरजू कुटुंबाच्या उदरनिर्वाह करीता १ लक्ष रुपये व १० क्विंटल तांदूळ

Advertisement

विकटु बाबा प्रतिष्ठानाची मदत पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे यांना १ लाख रुपयांचा चेक सुपूर्द

टाकळघाट:- टाकळघाट व एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीतील गरजू व गरीब लोकांच्या उदरनिर्वाह व जेवणाच्या व्यवस्थेकरिता विकटु बाबा प्रतिष्ठान कडून १ लाख रुपये व १० क्विंटल तांदूळ आज दि २९ मार्च ला दुपारी २ वाजता बुटीबोरी एम आय डी सी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे यांना सुपूर्द केला.

Gold Rate
26 July 2025
Gold 24 KT 98,300 /-
Gold 22 KT 91,400 /-
Silver/Kg 1,13,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व त्याचा वाढता संसर्ग बघता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉक डाऊन घोषित केले.त्याचसोबत संचारबंदी व जमावबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे बुटी बोरी एम आय डी सी मध्ये काम करणारे अनेक राज्यातील व विविध जिल्ह्यातील कामगार हे अडकून पडले आहे.अशावेळी एम आय डी सी मध्ये कचरा,भंगार तसेच पोटाची खडगी भरण्यासाठी मिळेल ते काम करून सकाळ संध्याकाळची चूल पेटविणारे अनेक कुटुंब आहेत. ज्यांना कालची चिंता व उद्याची पर्वा जे फक्त वर्तमाना चा विचार करीत जगतात अशा अनेक कुटुंबाणा लॉक डाऊन मुळे जगण्याचा संघर्ष करून उपासमारी सोबत लढा द्यावा लागत आहेत.अशा गरीब व गरजवंत कुटुंबांना उपाशी राहावे लागू नये म्हणून विकटु बाबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाना शामकूळे यांनी गरीब व गरजवंतांच्या जेवणासाठी १ लाख रुपये व १० क्विंटल तांदूळ देऊन सामाजिक बांधिलकी जपली.

बुटीबोरी ही आशिया खंडातील सर्वात मोठी औधोगिक वसाहत आहे.त्यामुळे येथे देशाच्या विविध प्रांतातून लोक उदरनिर्वाह करण्यासाठी आले.तथापि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सर्व यंत्रणाच कोलमडून पडल्यामुळे संपूर्ण देशात जमावबंदी व संचारबंदी लागू झाल्यामुळे यांच्या हाथाला कामच उरले नाही.काम नसल्यामुळे पैसा नाही व पैसे नसल्यामुळे चूल कशी पेटवायची असा प्रश्न निर्माण झाला अशातच टाकळघाट जी प क्षेत्राचे जी प सदस्य आतिष उमरे यांनी पुढाकार घेऊन संबधीत बाबीची जाणीव विकटु बाबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाना शामकुळे यांना दिली व त्यांनी तात्काळ मदत देण्यास होकार दिला व मदतही दिली.यावेळी विकटु बाबा प्रतिष्ठानचे सचिव बागडे,कोषाध्यक्ष जांभुळकर,सदस्य बनसोड,राजू भगत,जी प सदस्य आतिष उमरे,बुटीबोरी एम आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद ठाकरे,बुटीबोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख,पोलीस उपनिरीक्षक लगड,पत्रकार चंदू बोरकर,पो ह प्रमोद बन्सोड, विजय निकोसे,ना पो सी इकबाल शेख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

संदीप बलविर

Advertisement
Advertisement