Advertisement
मुंबई: उद्योगपती राहुल बजाज यांनी कुटुंब परंपरेचे मूल्य व वारसा स्वीकारला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल बजाज यांचे कौतुक केले आहे.
उद्योगपती आणि बजाज ग्रुपचे प्रमुख राहुल बजाज यांनी आज कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी १०० कोटी रुपये सरकारकडे दिले आहेत. त्याबद्दल शरद पवार यांनी ट्वीट करून धन्यवाद दिले आहेत.
राहुल बजाज हे नेहमीच देशासाठी अतिशय उदारपणे मदत करत आहेत. त्याबद्दल राहुल बजाज यांचे शरद पवार यांनी मित्र म्हणून आभार मानले आहेत.
Advertisement