Published On : Tue, Mar 17th, 2020

मटन मार्केट च्या दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Advertisement

– कोरोना व्हायरस चा धोका तरीही सुरक्षितता वाऱ्यावर


कामठी : जगभरातील ‘कोरोना’ विषाणूचा प्रसार भारतासह नागपुरात दाखल झाला आहे .या कोरोनाच्या भीतिने कामठी तालुक्यात सुदधा सावधानतेचा इशारा देण्यात आला असला तरी सावधानता बाळगणे हेच कोरोनाचे मुख्य औषध असे मानले जात असले तरी कामठी नगर परिषद हद्दित येणाऱ्या नगर पालिका निर्मित भव्य मटण मार्केट परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून येथील दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांच्या नाकीनऊ आले आहे एकीकडे कोरोना व्हायरस च्या भीतीने प्रशासनातर्फे स्वछता ठेवा,. असे विविध संदेश देण्यात येत असले तरी स्थानिक नगर परिषद प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षिता मुळे कोरोना व्हायरस सारख्या रोगाबाबत कामठी नगर परिषद किती जागृत आहे ते या मटण मार्केट च्या दुर्गंधीतून दिसून येते.

येथील शुक्रवारी बाजार परिसरात उघड्यावर मटण विकणारे मटण विक्रेते, मच्ची विक्रेते तसेच चिकन विक्रेते एकत्र बसून त्यांना योग्य सोय व्हावी व नागरिकाना सोयीचे व्हावे यासाठी नगर परिषद च्या वतीने येथील कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती नजीकच्या जागेत भव्य मटन मार्केट उभारण्यात आले ज्याचा लोकार्पण 19 फेब्रुवारी 2009 ला माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले होते यावेळी कांग्रेस पक्षाचे माणिकराव ठाकरे,माजी खासदार मुकुल वासनिक,विलास मुत्तेमवार , इमरान किदवई,बाळासाहेब थोरात, यादवराव भोयर, देवराव रड़के तसेच तत्कालीन नगराध्यक्ष शकूर नागानी प्रामुख्याने उपस्थित होते. या मटन मार्किट मध्ये बक्रयाचे मटन, कोंबड़ी आणि मासोळया ह्याएकाच ठिकाणी मिळाव्या तसेच शहरासह ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांना सोयीचे व्हावे या मुख्य उद्देशाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या निधीतुन हे भव्य मटण मार्केट उभारण्यात आले होते कसेबसे या ठिकाणी तात्पुरते काही दिवस सगळे मटण विक्रेत्यांनि व्यवसाय थाटले मात्र या ठिकाणी ग्राहकांचा मिळत असलेला अल्प प्रतिसाद च्या नावावर येथील मासोळे व चिकन विक्रेत्यांनी पूर्ववत ठिकाणी उघड्यावरच दुकान मांडले तर कायम राहले ते मात्र बकरे मटण विक्रेते..

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तर यामटन मार्किट परिसरात होणाऱ्या घानिमुळे परिसरातील नागरिकासह येथे येणाऱ्या ग्राहकांचे आरोग्य धोक्यात न यावे व घानीची विल्हेवाट लागावी यासाठी माजी नगराध्यक्ष नीरज यादव यांच्या कार्यकाळात 18 लक्ष 50 हजार रुपये चा निधि खर्च करुन फ़ायटोरिड टेक्नॉलॉजी प्रकल्प उभारण्यत आला हा प्रकल्प मटन मार्किट मध्ये निर्माण होणाऱ्या साँड़पानी तसेच घानीवर प्रथम बायलोजिकल ट्रीटमेंट त्यानंतर फिजिकल ट्रीटमेंट व अंतिम रासायनिक ट्रीटमेंट या तीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्वच्छ पाणी बाहेर पडणार व हे स्वछ पाणी मटन मार्केट च्या सफाईकरिता वापरण्यात येणार असे प्रयोजन होते मात्र नगर परिषद च्या अक्षामय दुर्लक्ष्य मुळे हा प्रकल्प शोभेची वस्तू ठरला असून खर्ची घातलेले 18 लक्ष 50 रुपये चा खर्चिलानिधी हा निरर्थक ठरला आहे तर आजच्या स्थितीत कत्तल केलेल्या बकर्याचे रक्त हे वाहत असून घाण पसरलेली असते या घाणीच्या बाजूला डुकरांच्या संचार असतो तसेच या परिसरातील सार्वजनिक स्वछतागृह, शौचालयाची दुरवस्था झालेली आहे तर येथील एका मूत्रालाय कक्षाला ताळेबंदी करन्यात आलेली आहे

सध्यस्थीतीत या मटण मार्केट च्या कडेला कुजलेले मांसाचे तुकडे ने परिसरात पसरलेल्या दुर्गंधीने नागरिकांचा जीव मेटाकुटीस आलेला आहे यासंदर्भात या प्रभागाचे नगरसेवक काशीनाथ प्रधान यांनी कामठी नगर परिषद चे मुख्याधिकारी तसेच तहसिल प्रशासनाला माहितीस्तव निवेदीत सुद्धा करण्यात आलेले आहे

तरीसुद्धा सदर दुर्गंधीचा प्रश्न वाऱ्यावर घेऊन जात असून महत्वहीन ठरवत आहेत तेव्हा या प्रकारच्या दुर्गंधीतून कुणी कोरोना व्हायरस ला बळी पडल्यास वा कुणाचे आरोग्य धोक्यात आल्यास संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नगरसेवक काशीनाथ प्रधान यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement