Published On : Tue, Mar 17th, 2020

कामठी बसस्थानक परिसरातील सार्वजनिक सुलभ शौचालयाचे वाजताहेत तीनतेरा

मागील पंधरा दिवसापासून सार्वजनिक शौचालय कुलुपबंद, उघड्यावरच करताहेत मूत्रविसर्जन

कामठी:-केंद्र शासनाने 2 ऑक्टोबर 2014 रोजी राष्ट्पिता महात्मा गांधी यांच्या जयंतिदिनाचे औचित्य साधून महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती दिनी म्हणजे 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देश स्वच्छ करण्याचा संकल्प करीत या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला याच अभियान अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान सुद्धा राबविण्याचा संकल्प करीत गाव स्वच्छ तर नागरिक स्वस्थ या अभियान अंतर्गत कामठी नगर परिषद च्या वतीने मे 2015 पासून या शौचालय योजनेची सुरुवात करण्यात आली यानुसार कामठी बसस्थानक परिसर नागरिक तसेच प्रवाशिना शौचालय ची सोय व्हावी या मुख्य उद्देशाने लाखो रुपयांचा शास्कोय निधीतून कामठी बसस्थानक च्या कडेला नाविन्यपूर्ण सुलभ शौचालय उभारण्यात आले .

मात्र या बसस्थानक व्यवसथापक च्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हे शौचालय मागील पंधरा दिवसापासून ताळेबंद असल्याने प्रवाशी तसेच नागरिकांना उघड्यावरच मूत्रविसर्जन करावे लागते त्यातच जुनी बाथरूम मध्ये घाण असल्याने प्रवासींना बाथरूम मध्ये जाणे हे जिकरीचे झाल्याने प्रवासींचे आरोग्य धोक्यात आले असून पुरुषवर्ग कसाबसा कुठेही बाथरूम करून आपली गरज पार पाडतो मात्र महिलांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.

तर हे सुलभ शौचालय तालेबंद राहत असल्याने येथील प्रवासीवर्ग तसेच परिसर नागरिकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते परिणामी उघड्यावर शौचविधी तसेच लघुशंका करीत असल्याने येथील व्यवसस्थापकीय विभागाच्या मनमानी कारभारामुळे हे शौचालय नामधारी राहत असून प्रशासकीय विभागाकडूनच स्वच्छ भारत अभियानाला गालबोट लावण्यात येत आहेत. त्यातच बसस्थानक विभाग आम्हाला याबाबत कुठलीही कल्पना नाही तर नगर परिषद प्रशासन सुद्धा याबाबत अनभिज्ञ असल्याने बसस्थानकातील या सार्वजनिक सुलभ शौचालयाचा वालो कोण?असाही प्रश्न इथे निर्माण झालेला आहे.

संदीप कांबळे कामठी