Published On : Tue, Mar 17th, 2020

येरखेड्यात पोलिसांची गस्त वाढवा

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा येथे नुकतेच एका अल्पवयीन शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण झाल्याच्या चर्चेला विराम मिळत नाही तोच काल दोन अल्पवयीन मुली आई वडिलांच्या रागावल्यावरून घरून निघत रात्रभर बाहेर राहल्या, कसेबसे जुनी कामठी पोलिसांच्या प्रयत्नाला यश मिळाल्याने दोन्ही अल्पवयीन मुलींना सुखरूप आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले तेव्हा या प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती न होता कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहावे यासाठी येरखेड्यात पोलिसांची गस्त वाढवावी या मागणीसाठी येरखेडा युवा मोर्चा च्या वतीने नवीन कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी ला सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.

याप्रसंगी युवा मोर्चा चे पदाधिकारी राहुल शर्मा(अध्यक्ष-भा.ज.यू. मोर्चा येरखेड़ा),महेश जी माथुरे(सामाजिक व भाजप कार्यकर्ता),कुबेर महल्ले(महामंत्री-युवा मोर्चा येरखेड़ा),रिषभ भोवते(युवा मोर्चा)राहुल परदेसी, राहुल परिहार,अंकित येरगुटवॉर,सूरज देवतले, वेदांत वंजारी, तुषार ढबाले,हर्षल वाडीभस्में,अमन नायडु, आदि कार्यकर्ते उपस्थित होते

संदीप कांबळे कामठी