Published On : Mon, Feb 17th, 2020

सी पी अँड बेरार हायस्कूलच्या १९८८ बँचच्या विद्यााथ्र्यांचे स्नेह संंमेलन संपन्न

Advertisement

तत्कालिन शिक्षकांनी माजी विद्यााथ्र्यांचे क्लासेस घेऊन शालेय जीवनाच्या जुन्या आठवणींना उजाळा देत सी. पी. अँड बेरार हायस्कूल, महालच्या १९८८ बँचच्या विद्यााथ्र्यांचा अनोखा स्नेह संमेलन रविवारी शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला.

स्नेह संमेलनाच्या आयोजनात धनंजय चांदे यांनी मोठी भूमिका बजावत या संमेलनाचे प्रमुख पाहुणे सी पी अँड बेरार, शिक्षण संस्थेचे सचिव अनिल महाजन, सीपी अँड बेरार शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पुरी होते.

यावेळी माजी विद्याार्थी तत्कालिन सर्व शिक्षकांचा भावपूर्ण सत्कार केला. यावेळी शिक्षकांनी आणि विद्यााथ्र्यांनी मनोगत व्यक्त केले. माजी विद्याार्थी ईश्वर घिरडे, राम देशपांडे, यांनी मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पीटीच्या वर्गाने सुरुवात झाली. कोरडे सर यांनी पीटीचा वर्ग घेतला. कोरडे सर १९८८ बॅचला पी.टी. शिकवत होते. त्यानंतर १५-१५ मिनिटांचे वर्ग झाले. यामध्ये पारखी मॅडम, आगवन मॅडम, शिंगाडे सर यांनी वर्ग घेतले. शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही प्रतिकात्मक शाळा भरवण्यात आली होती. ज्याप्रमाणे १९८८ मध्ये विद्याार्थी वर्गात बसून ज्ञानर्जन करीत होते. त्याच पद्धतीने आज माजी विद्याार्थी वर्गात बसून तत्कालीन शिक्षकांकडून मार्गदर्शन घेत असल्याचे एक आगळेवेगळे चित्र होते. या अनोख्या स्नेह मेळाव्याला १९८८ बॅचचे उत्तीर्ण विद्याार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संस्थेचे सचिव अनिल महाजन म्हणाले, शाळेतील शिक्षण टप्प्याटप्प्याने सुधारत गेले. मराठी ते इंग्लिश माध्यमाची शाळा झाली. येथे संस्कृत, मराठी व हिंदी तसेच इंग्रजी या चारही भाषा शिकवण्यात येतात.

प्रारंभी क्लासेस झाले. सहभोजन आयोजित करण्यात आले. आणि नंतर १९८८ बॅचच्या शिक्षक वृंदाचे पूजन करून त्यांचा सत्कार करण्यात आले. शिक्षक आणि माजी विद्यााथ्र्यानी मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. शेवटी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी माजी विद्यााथ्र्यांनी गीत गायन आणि नृत्य सादर केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन संचालन राजेश समर्थ यांनी केले. तर देवेश गोसावी यांनी आभार मानले.