मंत्री महोदयांच्या प्रमुख उपस्थितीत होणार सुवर्ण महोत्सव सोहळा संपन्न
रामटेक: नंदिवर्धन प्राथमिक माध्यमिक कनिष्ठ महविद्यालय नगरधन येथील सर्व कर्मचाऱ्यांची सभा सार्वजनिक ग्रामविकास मंडळ नगरधन चे सचिव नामदेवराव कडुकर यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच श्रावण बावनकुळे , भूषण कडूकर ,मुख्याध्यापक दिपक मोहाड यांच्या प्रमुख उपस्थीतीत शाळेला पन्नास वर्षे झाल्यामुळे सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात यावे त्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबिवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
नामदेव राव कडूकर यांनी सुवर्ण महोत्सव सभेमध्ये होणाऱ्या विभिन्न कार्यक्रमा विषयीचा आढावा घेण्यात आला. 20 जानेवारी 2020 ते 30 जानेवारी 2020 पर्यंत होणाऱ्या सुवर्णमहोत्सव कार्यक्रमाच्या दरम्यान अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना देऊन सर्व कर्मचाऱ्यानी शाळेचा स्थापनेपासून ते आतापर्यंत सर्व बाबी समजून सांगितल्या. नामदेवराव कडुकर सर व त्यांच्या मंडळाच्या सदस्यांनी जे लहानश्या शाळेत विद्यार्थ्यांना शिकवून जे बीज रोवले त्यांच्या अथक परिश्रमाने आज त्या शाळेने आज वटवृक्षाचे रूप धारण केले असल्याचे निदर्शनास येत आहे .
आज हजारो विद्यार्थ्यांकरिता शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली अश्या नामवंत शाळेच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाचे उदघाटन तसेच सुवर्णमेल स्मरणिकेचे विमोचन व शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन महाराष्ट्र राज्य विधिमंडळ चे विधानसभा अध्यक्ष आमदार नाना पटोले , महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनीलबाबू केदार, गृह मंत्री अनिलबाबू देशमुख ,नागपूर जिल्ह्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत ,माजी मंत्री राजेंद्र मुळक, रामटेक विधान सभा क्षेत्राचे आमदार ऍड. आशिष जयस्वाल तसेच आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याचे संस्थेचे सचिव नामदेवराव कडुकर यांनी ह्यावेळी सांगितले.ह्या कार्यक्रमात विद्यालयातील जाधव व सोमेश्वर दमाहे यांनी मास्टर गेम स्पर्धा पुणे येथे सहभाग घेतला याबददल त्यांचा सत्कार नामदेवरावजी कडुकर तसेच श्रावण बावनकुळे, शाळेचे प्राचार्य दिपक मोहोड यांच्या हस्ते करण्यात आला व सभेमध्ये उपस्थित सर्व मान्यवर व कर्मचऱ्यांचे अमित नेवारे यांनी आभार व्यक्त केले.