Published On : Mon, Dec 30th, 2019

रेल्वे अपघात नियंत्रणासाठी पिवळ्या रंगाचे पट्टे

Advertisement

– मध्य रेल्वेची अभिनव कल्पकता, रेल्वे अपघातात ९५ टक्के घट, रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच

नागपूर: नवीन वर्षात रेल्वे रुळांवरील अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी गडद पिवळ्या रंगाचा वापर करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. यासोबतच धोकादायक ठिकाणी अपघातामुळे होणाèया परिणामांचे पोस्टरदेखील आरपीएफ जवानांकडून लावण्याचे नियोजन आहे. ही अभिनव कल्पकता मध्य रेल्वेतर्फे मुंबई विभागात करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास इतर ठिकाणीही करण्यास हरकत नाही.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रेल्वे रुळांवरील अपघात नियंत्रणासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने धोकादायक ठिकाणी पिवळ्या रंगाचा प्रयोग करण्याची आधुनिक कल्पकता अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या तीन महिन्यांत मुंबई विभागातील ५० अतिधोकादायक ठिकाणी हे रंगाचे प्रयोग दिसतील.

कधी काळी रेल्वे अपघाताचे प्रमाण बरेच वाढले होते. रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्डाने याघटनांची गंभीर दखल घेतली. प्रवाशांत जनजागृती करण्यासाठी विविध उप्रकम राबविले. पथनाट्याच्या माध्यमातूनही रेल्वे नियमांचा प्रचार-प्रसार केला. परिणामी यंदा विभागात एकही अपघात झाला नाही, असा दावा केला जात आहे.

२०१८-१९ हे वर्ष रेल्वेसाठी आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात सुरक्षित ठरले आहे. या संदर्भातील आकडेवारी रेल्वेने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. एकेकाळी दोन गाड्यांची समोरासमोर धडक होऊन, क्राqसगमधील गोंधळ, आग लागणे, गाडी रुळावरून घसरणे अशा अपघातांमुळे प्रवाशांना जीव गमवावा लागत असे. मात्र, आता अपघातांमध्ये ९५ टक्क्यांनी घट झाली आहे. प्राप्त आकडेवारीनुसार २०१७-१८ मध्ये भारतीय रेल्वेच्या कार्यकक्षेत ७३ अपघात झाले होते. मात्र, यावर्षी अपघातात घट होऊन तो आकडा ५९ वर आला आहे.

सुरुवातीच्या वर्षांमध्ये रेल्वे अपघातांमध्ये जीवितहानीसुद्धा मोठ्या प्रमाणात होत होती. १९९० ते १९९५ या पाच वर्षांच्या काळात सुमारे २ हजार ४०० जणांचा मृत्यू झाला होता. तर २०१३ ते २०१८ या काळात सुमारे ९९० प्रवाशांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, यंदा रेल्वेने अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू झाला नसल्याचा दावा केला आहे.

Advertisement
Advertisement