Advertisement
नागपूर : शहरातील मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पलौती चौकाजवळ पीटसर वस्तीमध्ये आज एका अपघातात 9 वर्षीय माहिरा अशफाक शेख हिचा दुःखद मृत्यू झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरच्या झायलो गाडीच्या स्टेअरिंगमध्ये तांत्रिक अडचण आल्याने गाडी अनियंत्रित होऊन वस्तीमध्ये घुसली. यामध्ये माहिरा गाडी खाली आली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली.
कुटुंबीयांनी तिला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि ड्रायव्हरला ताब्यात घेतले आहे. तसेच, फॉरेन्सिक टीमही तपासासाठी घटनास्थळी पोहोचली आहे.
वस्तीमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली असून, मानकापूर पोलिस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.