मुंबई: राज्यातील शिक्षण व्यवस्थेचा गोंधळ उघडकीस आला आहे. तब्बल ८०० शाळा अनधिकृतपणे चालवली जात असल्याचं समोर आलं आहे. यातील शंभर शाळांना बंद करण्याचा निर्णय घेत शिक्षण विभागाने मोठा दणका दिला आहे. पुणे जिल्ह्यातदेखील ही कारवाई झडली असून, ५१ शाळा बोगस असल्याचं स्पष्टपणे अधोरेखित झालं आहे.
विशेष म्हणजे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार, जिल्ह्यातील बेकायदेशीर शाळांची संख्या प्रत्यक्षात १०० च्या पुढे असण्याची शक्यता आहे.
पालकांनी शाळा निवडताना ‘ही’ माहिती घ्यावी –
शाळा व्यवस्थापनाकडून मिळणाऱ्या गोड बोलण्यांना बळी न पडता, शाळेची शासकीय मान्यता आहे का याची खात्री करा. अन्यथा मुलांचे शैक्षणिक नुकसान तर होईलच, पण पालकांनाही पुढे नाहक त्रास सहन करावा लागेल.
या कागदपत्रांची नक्की चौकशी करा-
ना-हरकत प्रमाणपत्र (NOC)
शासकीय इरादापत्र
संबधित मंडळाचे मान्यता पत्र
पुणे जिल्ह्यातील बोगस शाळांची विभागनिहाय माहिती-
पुणे महापालिका हद्दीत:
९ पूर्णपणे अनधिकृत
५ फक्त इरादापत्र प्राप्त
९ स्थलांतरित व बिनमान्यतेच्या
जिल्हा परिषदेच्या हद्दीत:
८ बिनपरवानगी
५ अर्धवट दस्तऐवज असलेल्या
१५ अनधिकृत स्थलांतरित
UID पोर्टलवरून शाळेची नोंदणी तपासा
पालकांनी UID (यू-डायस) पोर्टलचा वापर करून शाळेचा नोंदणी क्रमांक आणि मान्यता पाहावी, जेणेकरून शाळा शासकीय मान्य आहे की नाही हे लगेच स्पष्ट होईल.
शिक्षण विभागाची कारवाई सुरू —
राज्यातील १३०० शाळांची छाननी सुरू असून त्यापैकी ८०० च्या अधिक शाळांमध्ये दस्तऐवज अपूर्ण असल्याचे आढळले. येत्या काळात अशा शाळांवर कारवाई करून विद्यार्थी अधिकृत शाळांमध्ये समायोजित करण्यात येणार आहेत.