Published On : Thu, May 19th, 2022

टिपेश्वर अभयारण्यात ७५३ प्राण्यांच्या नोंदी घेण्यात आल्या.

Advertisement

पांढरकवडा : टिपेश्वर अभयारण्या किर्रर्र झाडी असलेल्या वनक्षेत्रात उंच झाडावर बांधलेल्या मचाणीवर बसून लाईव्ह प्राणी दर्शन घेण्याचा आनंद निसर्ग पर्यटक बौद्ध पौर्णिमेच्यानिमित्ताने वन्य प्राणी गणना करण्यात आली. टिपेश्वर अभयारण्याचे यावर्षी मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांची नोंद झाली आहे. टिपेश्वर अभयारण्या ७५३ प्राण्यांच्या नोंदी घेण्यात आल्या. या वन्यजीवांच्या दर्शनामुळे वन्यप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण होते. रात्रीच्या अंधारात जंगलातील नीरव शांततेत रात्र किड्यांचा किर्रर्र आवाज, पौर्णिमेच्या चंद्राचा लख्ख प्रकाश अशा रोमांचकारी वातावरणात वन्यजीवप्रेमींनी जंगलातील विविध वन्य प्राण्यांचा प्रत्यक्ष दर्शनाचा थरार १६ मे रोजी अनुभवला.बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्री विविध जलसाठ्यांच्या ठिकाणी उंच मचाणीवर बसून पाणी पिण्यास येणाऱ्या वन्यप्राण्यांचे वर्णन वेळेनुसार केले जाते. २४ तासांत सर्व ठिकाणच्या नोंदी संकलित करून वन्यप्राण्यांची संख्या काढण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे.

परंतु, यात संख्या निश्चित काढता येत नसल्याने अनेकदा ही पद्धत बंद करून जंगलात स्वयंचलित कॅमेरे लावून, वन्यप्राण्यांचे फोटो काढून संख्या ठरविण्यात यावी, अशीही मागणी पुढे आली आहे. परंतु, पारंपरिक पद्धत पुढेही सुरू ठेवण्याचा निर्णय कायम राहिला आणि यालाच ‘निसर्ग अनुभव’ असे नाव देण्यात आले. वने आणि वन्यजीवप्रेमींना दरवर्षी निसर्ग अनुभवाचा आनंद याची देही याची डोळा’ सामावून घेता येऊ लागला. टिपेश्वर अभयारण्यांमध्ये २५ मचान बांधण्यात आले होते. या मचानवर २५ वन्यप्रेमींनी रात्रभर जागून वन्य प्राण्यांच्या हालचाली टिपल्या व त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा थरार अनुभवला.

अनेक वन्य प्राणी हे किर्रर्र जंगलात तसेच पाणवठ्यांवर तसेच मुक्त संचार करताना आढळून आले. मंगळवारी सकाळी वन्यप्रेमींनी या वन्य प्राण्यांचे पगमार्क घेतले आहेत.या दरम्यान निसर्ग प्रेमीनी प्रत्यक्ष रात्रभर अभयारण्यात राहुन त्याचा वेगळा अनुभव आपल्या गाठी बांधला व अभयारण्यातील वन्यजीव जसे वाघ, अस्वल, नीलगाय, रानकुत्रे, चितळ, रानडुकरे ईत्यादी प्राण्यांचे तसेच सर्पगरुड किंगफिशर, स्वर्गीय नर्तक, ड्रॉगो, सातभाई, रॉबीन, घुबड ईत्यादी पक्ष्याचे प्रत्यक्ष दर्शन व पक्षांच्या किलबीलाटीचे अनुभव घेण्यात आले.सदर कार्यक्रमाचे आयोजक हे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) म.रा. नागपुर व मुख्य वनसंरक्षक व क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती हे होते. पांढरकवडा वन्यजीव विभागाचे विभागीय वनाधिकारी किरण जगताप भावसे व टिपेश्वर अभयारण्याचे सहायक वनसंरक्षक आर. बी. कोंडावार यांचे मार्गदर्शन खाली तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी एम.एम. बाळापुरे, व्हि.आर.येवतकर व क्षेत्रीय कर्मचारी यांचे नियोजनुपर्ण परिश्रमातुन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

सैराट फेम ( लंगड्या) म्हणजेच तानाजी गालगुडे, सल्या म्हणजे अरबाज यांनी सुद्धा टिपेश्वर अभयारण्यमध्ये निसर्ग अनुभव’ घेतला आणि त्यांना आर्ची वाघिणीचे दर्शन झाले. त्यांना आर्चीला जवळून पाहता आले. सैराटमध्ये काम केल्यामुळं तानाजी आता प्रकाशझोतात आहे. अरबाजचेही असंच झालं. या दोघांनी टिपेश्वर अभयारण्यात येण्याचं ठरवलं. सकाळी ते अभयारण्यात गेले. सफारी करताना व्याघ्रदर्शन व्हावं, असं साऱ्यांनाच वाटतं. तशीच काहीशी आस लावून तानाजी आणि अरबाज बसले होते. ती आस पुरी झाली. पण, विशेष म्हणजे यावेळी त्यांना आर्चीचे दर्शन झाले. आर्ची ही या अभयारण्यातील एक वाघीण आहे. सैराट चित्रपटातही आर्ची होती, ती वेगळी बरं का…

योगेश पडोळे
प्रतिनिधि पांढरकवडा