Published On : Fri, Jul 17th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात भरधाव वाहनाची धडक; हिट अँड रनमध्ये ७४ वर्षीय सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

Advertisement

नागपूर : वर्धा रोडवरील चिंचभवन पुलाजवळ गुरुवारी सकाळी झालेल्या हिट अँड रन अपघातात ७४ वर्षीय सुरक्षा रक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

मृताची ओळख नागोराव भानोदास महाजन (वय ७४, रा. सोमलवाडा) अशी झाली आहे. ते चिंचभवन येथील स्वामीपुरम अपार्टमेंटमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. गुरुवारी सकाळी सुमारे ८.४० वाजता ते आपल्या दुचाकीने (एमएच-३१-बीटी-४०३१) कामावर जात असताना चिंचभवन पुलाजवळ मागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

धडकेनंतर नागोराव महाजन गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना एम्स रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी मृताचे पुत्र प्रवीण महाजन यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार वाहनचालकाचा शोध सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण तपासले जात आहे.

Advertisement

दरम्यान, शहरात वाढत असलेल्या हिट अँड रनच्या घटनांमुळे भरधाव वाहनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.