Published On : Thu, Jun 9th, 2022
By Nagpur Today Nagpur News

73 लाख 49 हजार सडक्या व भेसळयुक्त सुपारीचा

तर 2 लाख 65 हजार किमतीचा
गुटखा, पानमसाला,सुगंधीत तंबाखुचा
साठा जप्त

नागपूर : संशयित सडक्या, भेसळयुक्त सुपारीचा 73 लाख 49 हजार 499 रुपये किंमतीचा साठा तसेच गुटखा, पानमसाला व सुगंधीत तंबाखुचा 2 लाख 65 हजार 420 रुपये किंमतीचा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने विविध माध्यमामार्फत एप्रिल व मे महिन्यात अनेक ठिकाणी धाडी टाकून जप्त केला आहे.

Gold Rate
26 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,400 /-
Gold 22 KT ₹ 1,06,400 /-
Silver/Kg ₹ 1,38,100/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

73 लाख 49 हजार 499 हजार रुपये किमंतीच्या साठ्यामध्ये उमेर ट्रेडिंग कंपनी शांतीनगर, नागपूर यांचा 38 लाख 40 हजार 700 रुपये किंमतीचा 9 हजार 594 किलोगॅम साठा, मे. क्वॉलिटी ट्रेडर्स कळमना नागपूर यांचा 20 लाख 59 हजार 800 रुपये किंमतीचा 9 हजार 464 किलोगॅम साठा, मे. गुरु ट्रेडर्स मस्कासाथ, इतवारी, नागपूर यांचा 6 लाख 61 हजार59 रुपये किंमतीचा 2 हजार 998 किलोगॅम साठा तर मे. ज्योती गृह उद्योग, न्यु सूरज नगर, रिंग रोड, वाठोडा नागपूर 7 लाख 87 हजार 940 हजार किंमतीचा 2 हजार 768 किलोगॅम साठा जप्त करण्यात आला आहे.

त्यासोबतच प्रतिबंधित अन्न पदार्थ गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखु यांचा 2 लाख 65 हजार 420 रुपये किंमतीचा साठा जप्त करुन पोलीस स्टेशन भादवि कलम व अन्न सुरक्षा अधिकार व मानदे कायदा 2006 च्या कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आलेले आहे.

यामध्ये नितीन कन्हैय्यालाल थारवानी नागपूर 42 हजार 930 रुपये किंमतीचा 31.8 किलोगॅम साठा, मोहम्मद साजिद मोहम्मद ईस्माईल नागपूर 5 हजार 970 रुपये किंमतीचा 5.97 किलोग्रॅम साठा, मोहम्मद रिजवान मोहम्मद शाकीब अंसारी नागपूर यांचा 1 लाख 1 हजार 830 रुपये किंमतीचा 119.8 किलोगॅम साठा, वजरंग रामलाल शाहू, जयवंत नगर नागपूर यांचा 46 हजार 576 रुपये किंमतीचा 64.9 किलोगॅम साठा, अब्दुल रशिद अब्दुल जब्बार मोमिनपूरा नागपूर यांचा 41 हजार 684 रुपये किंमतीचा 45.96 किलोगॅम साठा, पिंकल चुन्नीभाई पटेल, वार्ड क्र.5, सावनेर यांचा 5 हजार 164 रुपये किंमतीचा 3.52 किलोगॅम साठा तर वकारुद्दीन वजाऊदीन सिध्दीकी, ताज नगर नागपूर यांचा 21 हजार 266 रुपये किंमतीचा 29.13 किलोगॅम साठ्याचा समावेश आहे.

अन्न पदार्थ जप्त करुन अन्न नमूने अन्न विश्लेषकांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून प्रतिबंधित अन्न पदार्थांचे विक्रेत्यांना पोलीसाकडून अटक करण्यात आली आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानूसार कायदेशिर कार्यवाही करण्यात येणार आहे.

ही कारवाई नागपूर विभागाचे सह आयुक्त(अन्न) सु. गं. अन्नपुरे व सहाय्यक आयुक्त प्रशांत देशमुख याच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा अधिकारी पी. व्ही. मानवतकर, व्हि. पी. धवङ अ.अ. उपलप, श्रीमती एस. व्ही. वाभरे व अ. ए. चौधरी यांनी केली आहे.

Advertisement
Advertisement