Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, May 10th, 2018

  पुढच्या वर्षी सुट्ट्यांची लयलूट, रविवारसह तब्बल 73 रजा

  मुंबई : काही लोक नोकरी करतांना नेहमी सुट्टींवर डोळा डोळा ठवून असतात अशा लोकांसाठी आनंदची बातमी; २०१९ मध्ये रविवार धरुन ७३ सुट्ट्या मिळणार आहेत!
  यात

  आत्ता कुठे 2018 चा मे महिना सुरु असला, तरी अनेक जणांना 2019 सालचे वेध लागले आहेत. पुढच्या वर्षी फिरायला जाण्याचं किंवा लग्नाकार्याचं प्लानिंग करायचं असेल, तर सुट्ट्या पाहणं मस्ट! सुट्टी म्हटली की बच्चेकंपनींपासून नोकरदारांपर्यंत सगळे जण खुश होतात. पुढच्या वर्षात तुम्हाला रविवार धरुन तब्बल 73 सुट्ट्या मिळणार आहेत.

  52 आठवड्यांचे 52 रविवार आणि सणावाराच्या 21 सु्ट्ट्या असे एकूण 73 दिवस सुट्ट्या आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना शनिवार-रविवार सुट्टी असते, त्यांना तर 120 दिवस सुट्ट्या मिळणार आहेत. मात्र, तीन सण रविवारी आल्यामुळे त्या तीन सुट्ट्या कमी झाल्या आहेत!

  2019 सालची दिनदर्शिका तयार करण्याचं काम पूर्ण झाले असून पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी पुढील वर्षीच्या सुट्ट्यांचे सांगितले दिवस असे –

  रविवारी आलेल्या तीन सुट्ट्या

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (14 एप्रिल), लक्ष्मीपूजन (27 ऑक्टोबर),
  ईद-ए मिलाद (10 नोव्हेंबर)

  शनिवारी पाच सुट्ट्यांची आल्या आहेत. यामुळे शनिवार-रविवार सुट्टी असणाऱ्यांचे नुकसान झाले आहे.
  शनिवारी आलेल्या सुट्ट्या – प्रजासत्ताक दिन : 26 जानेवारी, गुढीपाडवा : 6 एप्रिल, श्रीरामनवमी : 13 एप्रिल, बुद्धपौर्णिमा : 18 मे, पतेती : 17 ऑगस्ट

  सोमवारी आलेल्या सुट्ट्या

  महाशिवरात्री : 4 मार्च (पहिला शनिवार-रविवार-सोमवार), बकरी ईद : 12 ऑगस्ट (दुसरा शनिवार-रविवार-सोमवार), श्रीगणेश चतुर्थी : 2 सप्टेंबर (पहिला शनिवार-रविवार-सोमवार), दिवाळी बलिप्रतिपदा : 28 ऑक्टोबर (चौथा शनिवार-रविवार-सोमवार)

  सुट्ट्यांमध्ये मुस्लिम धर्माच्या सुट्ट्याही दिल्या आहेत पण त्यांचे दिवस चंद्रदर्शनाप्रमाणे दिवसाने बदलू शकतात (एक दिवस मागे-पुढे). सरकार या सुट्ट्यांची अधिकृत यादी नंतर प्रसिद्ध करते.

  सार्वजनिक (सरकारी) सुट्या

  प्रजासत्ताक दिन : शनिवार, 26 जानेवारी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती : मंगळवार, 19 फेब्रुवारी, महाशिवरात्री : सोमवार, 4 मार्च
  धुलिवंदन : गुरुवार, 21 मार्च, गुढीपाडवा : शनिवार, 6 एप्रिल, श्रीरामनवमी : शनिवार, 13 एप्रिल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : रविवार, 14 एप्रिल, श्रीमहावीर जयंती : बुधवार, 17 एप्रिल

  गुड फ्रायडे : शुक्रवार, 19 एप्रिल, महाराष्ट्र दिन : बुधवार, 1 मे, बुद्धपौर्णिमा : शनिवार, 18 मे, रमजान ईद : बुधवार, 5 जून
  बकरी ईद : सोमवार, 12 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन : गुरुवार, 15 ऑगस्ट

  पतेती : शनिवार, 17 ऑगस्ट, श्रीगणेश चतुर्थी : सोमवार, 2 सप्टेंबर
  मोहरम : मंगळवार, 10 सप्टेंबर,महात्मा गांधी जयंती : बुधवार, 2 ऑक्टोबर, विजयादशमी (दसरा) : मंगळवार, 8 ऑक्टोबर, दिवाळी लक्ष्मीपूजन : रविवार, 27 ऑक्टोबर, दिवाळी बलिप्रतिपदा : सोमवार, 28 ऑक्टोबर, ईद-ए-मिलाद : रविवार, 10 नोव्हेंबर, गुरु नानक जयंती : मंगळवार, 12 नोव्हेंबर, नाताळ : बुधवार, 25 डिसेंबर


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145