Published On : Wed, Apr 19th, 2023
By Nagpur Today Nagpur News

आनंदयात्री विदर्भस्तरीय एकांकिका स्पर्धेत 7 एकांकिका सादर

आनंदयात्री विदर्भस्तरीय एकांकिका स्पर्धेत 7 एकांकिका सादर
Advertisement

नागपूर: आनंदयात्री , या फेसबुक समुहातर्फे आयोजित विदर्भस्तरीय एकांकिका स्पर्धेत  विदर्भ विभागातून एकूण ७ एकांकिका सादर करण्यात आल्या. अप्रतिम सादरीकरण आणि उत्तम संहिता च्या जोरावर सुंदर नाट्य अविष्कार चे सादरीकरण हौशी नाट्य कलावंतांनी सादर केले.  ज्यात भंडारा (पंख छाटले पतंगाचे) , तुमसर (म्हाताऱ्याची व्यथा)  , बुलढाणा ( नाटेवा न्नसंप  आणि अनपेक्षित) , वर्धा (निशाणी डावा आंगठा )  आणि नागपूर  (आणि हिटलर येतो व स्टॉप ) येथील हौशी कलावंतांनी आपली कला सादर केली . विदर्भात नाट्यक्षेत्रातील होतकरू  हौशी कलावंत, दिग्दर्शक, लेखक  ह्यांना आपली कला, प्रदर्शित करण्यास एक व्यासपीठ मिळावे तसेच विदर्भातील नाट्यचळवळीला प्रोत्साहन मिळावे यासाठी विदर्भस्तरीय “आनंदयात्री एकांकिका स्पर्धा” आयोजित करण्यात आल्या होत्या . 

आनंदयात्री’ या फेसबुक समूहातर्फे आयोजित विदर्भस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात नागपुरातील प्रख्यात कलावंत श्री पराग घोंगे  आणि श्री अनिल पालकरचा  ह्यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. ‘साई सभागृहा’त संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते राजे मुधोजी राजे भोसले तसेच प्रमुख अतिथी होते विदर्भ गौरव प्रतिष्ठान चे श्री गिरीश गांधी तर  विशेष अतिथी म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते पोलीस उपयुक्त  अशोक बागुल.

Gold Rate
Mar 25,2026 - Time 11.05Hrs
Gold 24 KT ₹ 1,45,900 /-
Gold 22 KT ₹ 1,35,700 /-
Silver/Kg ₹ 2,37,600/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आनंद यात्री समूहातर्फे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  रुपेश रेवतकर, विद्या उमाळे, स्वाती दिवेकर, अस्मिता महिंद्रकर, विवेक गोतमारे, तेजस भातकुलकर  आणि प्रतिभा वाळके यांनी परिश्रम घेतले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन अस्मिता महिंद्रकर/ स्वाती दिवेकर ह्यांनी केले तसेच प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय रुपेश रेवतकर, लीना पाटील आणि विद्या उमाळे ह्यांनी करून दिला .   

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement