Published On : Tue, Apr 14th, 2020

नागपूरमध्ये ७ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले; एकूण संख्या ५५वर

नागपूर: एकीकडे राज्याची राजधानी मुंबईत करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे उपराजधानी नागपूरमध्ये देखील रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. नागपूर शहरात मंगळवारी अजून ७ नवे करोाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णांची संख्या आता ५५वर पोहोचली. नागपूर महापालिकेनं याबाबत माहिती दिली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, आज जे ७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यांपैकी ५ रुग्ण हे शहरातील सतरंजीपुरा भागातील आहेत. या लोकांना आधीच क्वारंटानमध्ये पाठवण्यात आलं होतं. यानंतर त्यांचे चाचणी अहवाल समोर आल्यानंतर त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, यातील एक व्यक्ती ही अजमेरहून नागपूरमध्ये परतली होती. या व्यक्तीला देखील क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याचाही चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

या लोकांच्या संपर्कात अजून कोणी आलं आहे का? त्यांचा शोध घेतला जात असून त्यांना क्वारंटाइन करुन चाचणीही करण्यात येणार आहे.