Published On : Thu, Feb 5th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात बनावट RTO चलानच्या लिंकद्वारे ७.१२ लाखांची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा!

Advertisement

नागपूर : बनावट RTO चलान भरण्याच्या लिंकद्वारे सायबर गुन्हेगारांनी नागपूरमधील ५४ वर्षीय नागरिकाची ७.१२ लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

पीडित व्यक्तीचे नाव नरेंद्र दुबे असे आहे. २८ जानेवारी रोजी बँक ऑफ इंडियामध्ये पासबुक अद्ययावत करत असताना त्यांच्या खात्यातून १२ हजार रुपयांची संशयास्पद रक्कम एका अनोळखी प्लॅटफॉर्मद्वारे वळती झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी खात्याच्या व्यवहारांची तपासणी केली असता मोठ्या फसवणुकीचा प्रकार उघड झाला.

Gold Rate
Feb 18 th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,53,700 /-
Gold 22 KT ₹ 1,42,900 /-
Silver/Kg ₹ 2,40,700 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ व २४ जानेवारीदरम्यान सायबर गुन्हेगारांनी दुबे यांच्या मोबाईलवर RTO चलान भरण्याच्या नावाखाली एक बनावट मोबाइल अ‍ॅप्लिकेशन (APK फाइल) पाठवली होती. सदर अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर त्यांच्या बँक खात्याचा ताबा सायबर गुन्हेगारांनी मिळवला आणि एकूण ७.१२ लाख रुपये परस्पर वळते केले.

या प्रकरणी फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या (IT Act) संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सायबर पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या अनोळखी लिंक, APK फाइल किंवा चलान संदेशांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement