Published On : Sun, Jul 1st, 2018

नागपूर मेट्रोचे ६५ टक्के कार्य पूर्ण

नागपूर : शहरात निर्माणाधीन मेट्रो प्रकल्पाच्या चारही मार्गिकांवर मेट्रो प्रकल्पाचे वेगाने कार्य पूर्ण होत आहे. ज्याप्रमाणे वर्धा मार्गावरिल रिच-१ कॉरिडोरचे कार्य पूर्ण केले जात आहे त्याचप्रमाणे हिंगणा मार्गावरील रिच-३ कॉरिडोरचे कार्य वेगाने पूर्ण होताना दिसत आहे. याठिकाणी कार्याचा आढावा घेतला असता ६५ टक्क्याहुन अधिक कार्य आतापर्यंत पूर्ण झाले आहे.

सीताबर्डी येथील मुंजे चौक मेट्रो स्टेशन ते लोकमान्य नगर पर्यंत अश्या १०.३ किमीच्या या मार्गावर एकूण १० स्टेशन प्रस्तावित आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय आणि एमआयडीसीमुळे रिच-३ मार्गावर वाहनचालकांची मोठी गर्दी होताना निदर्शनास येते.

या मार्गावर आतापर्यंत ५६४ पाईल पैकी ५०४, ओपन फाऊंडेशन २६९ पैकी २५६, पाईल कॅप १२९ पैकी ९६, व्हायाडक्ट पियर ३३७ पैकी २६३ व स्टेशन पियर काँक्रिट ६१ पैकी ४९. कार्य पूर्ण झाले आहे. सध्या याठिकाणी वाहतुकीचे सुयोग्य व्यवस्थापन करून मेट्रोचे कार्य पूर्ण केले जात आहे. या भागात मेट्रोच्या कार्याला नागरिकांचा देखील उत्तम सहकार्य याठिकाणी महा मेट्रोला मिळत आहे.