नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने आपल्या बँक खात्याबाबत मोठा दावा मोदी सरकारवर हल्लाबोल केला. काँग्रेस पक्षाच्या खात्यांमधून बँकांनी पैसे जप्त केल्याबद्दल काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांनी सरकारकडून बँकांवर दबाव टाकण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केला. बँकांकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, बँकांना आमच्या ठेवी जप्त करण्यास भाग पाडण्यात आले.
कसभा निवडणुकीपूर्वी आमचे खाते सरकारने हायजॅक केले आहे. आमच्या जमा खात्यातून 65 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. काँग्रेस युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्या खात्यातून ही रक्कम घेण्यात आली आहे. भारताच्या विरोधाचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
याआधी काँग्रेसचे अजय माकन यांनी दावा केला होता की, लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या काही दिवस आधी 2018-19 च्या आयकर रिटर्न आणि 210 कोटी रुपयांच्या आधारे काँग्रेसची अनेक बँक खाती गोठवण्यात आली होती. पत्रकार परिषदेत अजय माकन यांनी आयकर विभागावर खाती गोठवल्याचा आरोप केला होता.