Published On : Sat, Jul 7th, 2018

महाराष्ट्रातील ६३ टक्के सरकारी कर्मचाऱ्यांची वेळेवर हजेरी, १५.५ टक्के येतात अकरानंतर!

Advertisement

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील एकूण ३.१४ लाख कर्मचा-यांपैकी ६३ टक्के कर्मचारी दररोज कार्यालयात वेळेवर येतात, असे समोर आले आहे. पण या बाबतीत हरयाणा, पंजाब ही राज्ये महाराष्ट्राच्या तुलनेत आघाडीवर आहेत, तर पश्चिम बंगाल आणि बिहारमधील स्थिती राज्यापेक्षा वाईट आहे.

देशभरात सर्व सरकारी कार्यालयात गुरुवार, ६ जून रोजी कर्मचा-यांच्या बायोमेट्रिक हजेरीची माहिती संकलित करण्यात आली होती. त्यानुसार हरयाणामध्ये एकूण ९७ टक्के कर्मचारी वेळेआधीच कार्यालयात येतात तर पंजाबमध्ये हाच आकडा ९२ टक्के
इतका आहे.

त्यानंतर अन्य राज्यांमध्ये हे प्रमाण राजस्थान ८८.७, दिल्ली ८६, उत्तरप्रदेश ८०, गुजरात ७० टक्के, मध्य प्रदेश ५२ आणि कर्नाटकमध्ये ६८ टक्के इतके आहे.

निम्मे कर्मचारी एक तास आधीच येतात
बायोमेट्रिक हजेरीच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील ६३% कर्मचारी सकाळी ९ ते १० च्या दरम्यान कार्यालयात हजर असतात. यातील ५०% तर ९ च्याही आधीच कार्यालयात पोहचतात.

महाराष्ट्रात एकूण १९० सरकारी आस्थापनांमध्ये ३.१४ लाख कर्मचाºयांची बायोमेट्रिक हजेरी घेतली जाते. यात ५.२ टक्के कर्मचारी ठरलेल्या वेळेआधी एक तास पोहचतात तर ८.२ टक्के अर्धा तास आधी येतात.